Best Transport : ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ उभारणार मुंबईकरांची लोकचळवळ; महापालिका आणि बेस्टवर केले हे आरोप

1468
Best Transport : ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ उभारणार मुंबईकरांची लोकचळवळ; महापालिका आणि बेस्टवर केले हे आरोप
Best Transport : ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ उभारणार मुंबईकरांची लोकचळवळ; महापालिका आणि बेस्टवर केले हे आरोप
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

सन २०१९ पासून भाडेतत्त्वावरील अर्थांत  वेट लीज वरील मोठ्या प्रमाणावर गाड्या घेतल्याने बेस्टचा विस्तार होईल,अशी जी काही चर्चा होती, ती सर्व बोगस असून केवळ बेस्टला मर्यादित करण्यासाठी किंवा संपविण्यासाठी या वेट लिजवरील बसेसचा  वापर केला जात आहे. तसेच बेस्टला, मेट्रो प्रकल्पाशी स्पर्धा करण्यापासून रोखणे आणि  शहरातील बेस्टच्या जमीन अर्थात आगारांच्या जागांचे व्यावसायिक फायद्यासाठी खुल्या करण्यासाठीच हा डाव असल्याचा आरोप आमची मुंबई, आमची बेस्ट या संस्थेने केले आहेत. सार्वजनिक वाहतूक हा सर्व नागरिकांचा हक्क आहे.  ही अत्यावश्यक सार्वजनिक सेवा वाचवण्यासाठी आणि उपक्रमाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सर्व मुंबईकरांनी एकत्र यावे असे आवाहनही या संस्थेद्वारे करण्यात आले आहे. (Best Transport)

(हेही वाचा- Sindhu River: चीनला चोख प्रत्युत्तर! भारतीय लष्कराने सिंधू नदीवर बांधला नवीन पूल)

आमची मुंबई, आमची बेस्ट या संस्थेद्वारे बुधवारी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता जाहिर सभा मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित केली असून यामध्ये राजु परुळेकर आणि प्राध्यापक ताप्ती मुखोपाध्याय हे प्रमुख वक्ते आहेत.  या संस्थेने असे म्हटले आहे की, सन २०१९ पासून बेस्टच्या अधिकाऱ्यांनी, मुंबईत बसची संख्या वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात बसेसच्या संख्येत घट होत आहे. सन २०१० मध्ये बेस्टकडे ४३८५ मजबूत असा सार्वजनिक बसचा ताफा होता. पण या वर्षी जुलैपर्यंत एकूण बसची संख्या ३१५८ पर्यंत घसरली असून त्यापैकी फक्त १०७२ बस या  बेस्टच्या आहेत. येत्या काही वर्षांत बेस्टच्या मालकीचा ताफा पूर्णपणे नाहीसा होईल. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक समस्यांना तोंड देत, बेस्ट आणि बीएमसी आता ‘महसूल मिळवण्यासाठी’ मौल्यवान सार्वजनिक जमिनींचा पुनर्विकास करण्याच्या योजना आखत आहेत. दरम्यान, कमी होत चाललेला ताफा, लांब पल्ल्याचे बंद केले बसमार्ग, छोट्या बसेसची दुरवस्था, वळवलेले मार्ग, कामकाजातील गोंधळ यामु‌ळे सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास असह्य झाला असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. (Best Transport)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : मीराबाई चानू ऑलिम्पिक पदक राखणार का? भारताचं संपूर्ण वेळापत्रक)

भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका या शहर बस सेवेला सबसिडी देण्यासाठी, त्यांचा अर्थसंकल्प हा बेस्टच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यास का नकार देत आहे? तोट्यात चाललेल्या मेट्रो रेल्वेवर सुमारे एक लाख कोटी रुपये कर्ज घेऊन खर्च केलेला असताना बेस्टशी हा भेदभाव का? सुरक्षित, मोठ्या बेस्ट बसेसच्या जागी छोट्या, खराब देखभाल असलेल्या भाडेतत्त्वावरील किंवा कंत्राटदाराच्या मालकीच्या खाजगी बसेस का बदलल्या जात आहेत, ज्या वारंवार बिघडतात किंवा पेट घेतात? भाडेतत्त्वावरील बसेसमध्ये कंडक्टर का नाहीत? बेस्टच्या जमिनींच्या पुनर्विकासाचा फायदा कोणाला होणार? नवीन द्रुतगती मार्ग, पूल आणि मेट्रोचा विचार करताना सरकार श्रीमंत, मात्र बेस्टसारख्या कष्टकरी लोकांसाठी अत्यावश्यक सार्वजनिक सेवांचा विचार करताना सरकार गरीब का होते? परवडणारी, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे कोणत्याही राजकीय पक्षाचे निवडणूक आश्वासन का नाही,असे विविध प्रश्न ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ द्वारे उपस्थित केले आहेत. (Best Transport)

वर्षापूर्वीच, बेस्ट ही भारतातील एक अनुकरणीय सार्वजनिक बस व्यवस्था म्हणून ओळखली जात होती. अवघ्या दहा वर्षात, महानगर पालिका आणि बेस्ट व्यवस्थापनाने अशी व्यवस्था कशी मोडकळीस आणता येते हे यशस्वीपणे दाखवून दिले आहे. यांनी परवडणारी आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे आणि त्या जागी विविध खाजगी कंत्राटदारांच्या मालकीच्या, कर्मचारी असलेल्या बसेसचे अविश्वसनीय आणि असुरक्षित जाळे तयार केले आहे. असा आरोपही ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ द्वारे करण्यात आला आहे. (Best Transport)

(हेही वाचा- प्रभादेवीत Shivsena आणि उबाठा गटांचे कार्यकर्ते भिडले; बोर्डावरील धनुष्यबाण चिन्हावरून वाद)

सार्वजनिक वाहतुकीसाठी बांधील असलेली नागरिक मोहीम म्हणून ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ ने केलेल्या मागण्या

– परवडणारी सार्वजनिक वाहतूक हा आमचा मूलभूत अधिकार आहे. महापालिका अर्थसंकल्पाचा भाग म्हणून बेस्टला सबसिडी द्या आणि बेस्ट चालवा. (Best Transport)

– सार्वजनिक वाहतूक ही अत्यावश्यक सेवा आहे, व्यवसाय नाही, कंत्राटदारांनी चालवलेल्या बसेस बंद करा – बेस्टचा ताफा पूर्णपणे सार्वजनिक (बेस्टच्या मालकीचा) करा. (Best Transport)

-सार्वत्रिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध असणे, हे वाहतूक नियोजनाचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. बंद केलेले सर्व बस मार्ग पुन्हा सुरू करा. (Best Transport)

–  सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण सुधारणे हे पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आहे. बसेसची संख्या २००० लोकसंख्येमागे किमान १ बस पर्यंत वाढवा (किमान ६००० बसेस.) (Best Transport)

 – लोकांना खाजगी वाहतुकीपासून परावृत्त करून सार्वजनिक वाहतुक वापरण्यास प्रोत्साहित करा. सर्व सामान्य लोकांना वेळेवर प्रवास करण्याचा अधिकार आहे. बेस्ट बसेसना मुख्य रस्त्यांवर वेगळ्या स्वतंत्र मार्गिका द्या (Best Transport)

– सार्वजनिक जमीन ही जनतेची आहे, बिल्डरांची नाही. बेस्ट डेपोंचा पुनर्विकास थांबवा.  (Best Transport)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.