Paris Olympic 2024 : विनेशने अंतिम फेरी गाठल्यावर अभिनेत्री कंगना रनौतची सोशल मीडिया पोस्ट का चर्चेत आहे? 

Paris Olympic 2024 : विनेशने ५३ किलो वजनी गटात भारतासाठी कुस्तीतील पदक निश्चित केलं आहे 

229
Paris Olympic 2024 : विनेशने अंतिम फेरी गाठल्यावर अभिनेत्री कंगना रनौतची सोशल मीडिया पोस्ट का चर्चेत आहे? 
Paris Olympic 2024 : विनेशने अंतिम फेरी गाठल्यावर अभिनेत्री कंगना रनौतची सोशल मीडिया पोस्ट का चर्चेत आहे? 
  • ऋजुता लुकतुके

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) ५३ किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठून भारतासाठी या ऑलिम्पिकमध्ये चौथं पदक निश्चित केलं आहे. आता तिचा अंतिम फेरीतील मुकाबला बुधवारी रात्री होणार आहे. विनेश अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी सुशील कुमारने (Sushil Kumar) लंडन ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी केली होती. विनेशवर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच आणखी एका पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सरन (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधातील आंदोलनात विनेश पुढे होती. सरकारविरोधात ११ महिने नवी दिल्लीत हे आंदोलन चाललं. आता विनेशला पदक मिळाल्यावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतने (Kangana Ranaut) एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. (Paris Olympic 2024)

कंगना रणौतने (Kangana Ranaut) सोशल मीडियावर विनेशच्या यशाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, ‘भारताला पहिले सुवर्ण मिळावे यासाठी मी प्रार्थना करत आहे. विनेश फोगट (Vinesh Phogat) एकदा आंदोलनात सहभागी झाली होती, ज्यात तिने ‘मोदी तुमची कबर खोदणार’ असे म्हटले होते. असे असतानाही त्याला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तिला उत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सुविधा मिळाल्या. हेच लोकशाहीचे सौंदर्य आणि सर्वोत्कृष्ट नेत्याचे चिन्ह असल्याचे कंगनाने म्हटले. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Best Transport : ‘आमची मुंबई, आमची बेस्ट’ उभारणार मुंबईकरांची लोकचळवळ; महापालिका आणि बेस्टवर केले हे आरोप)

विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि इतर काही कुस्तीपटूंनी  भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. कुस्तीपटूंचे हे आंदोलन राजकीय हेतूने आणि काही खेळाडूंना निवड प्रक्रिया, इतर बाबींमध्ये विशेष सवलत मिळावी यासाठी होते असाही दावा केला जात होता. त्यानंतर आता विनेशने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारत आपले पदक निश्चित केले आहे. (Paris Olympic 2024)

WhatsApp Image 2024 08 07 at 10.56.52 AM

बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधातील आंदोलनामुळे विनेश जवळपास वर्षभर कुस्तीच्या आखाड्यापासून दूर होती. विनेशने आता ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारत एकच खळबळ उडवून दिली आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : जर्मनीविरुद्ध शेवटच्या ८ सेकंदातही भारताने गोलचा जोरदार प्रयत्न केला….)

विनेशने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युक्रेनच्या ओसाना लिवाचचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. तिने आठव्या मानांकित कुस्तीपटूचा ७-५ असा पराभव केला. याआधी उपउपांत्यपूर्व फेरीत तिने जपानच्या अव्वल मानांकित युई सुसाकीचा ३-२  असा पराभव करून मोठा उलटफेर केला होता. विनेश फोगटने अंतिम फेरीतही अशीच दमदार कामगिरी केली तर ती भारताला या ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्ण मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.