शरद पवार यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सोनिया दुहान यांनी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘मी सुप्रिया सुळे यांच्यामुळे पक्ष सोडतेय’, असं ठामपणे सांगून त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडल्या होत्या.
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : जर्मनीविरुद्ध शेवटच्या ८ सेकंदातही भारताने गोलचा जोरदार प्रयत्न केला….)
त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेता भुपिंदर शुदा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयभान चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासंदर्भात त्यांनीच एक्सवरून माहिती दिली.
मिशन २०२४ मध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याचं काम करणार
एक्सवरील पोस्टमध्ये सोनिया दुहान (Sonia Doohan) यांनी म्हटले आहे की, आज दिल्लीत खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या नीतीला प्रभावित होऊन हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भुपिंदर शुदा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष उदयभान यांच्या नेतृ्त्त्वाखाली विधानसभेच्या माझ्या समर्थकांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मिशन २०२४ च्या काँग्रेसला पाठिंबा देण्याचं काम करणार आहे. येणाऱ्या काळात हरियाणाच्या सर्व विधानसभेसाठी जुन्या सहकाऱ्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे.”
सोनिया दुहान या शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जात होत्या. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरिस त्यांनी जेव्हा पक्ष सोडला, तेव्हा पक्षांतर्गत मोठी खळबळ माजली होती.
२०२३ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या वेळी शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान त्यांच्या मागेच होत्या. तेव्हापासून सोनिया दुहान (Sonia Doohan) नाव चर्चेत आले आहे.
आज दिल्ली में सांसद श्री दीपेंद्र सिंह हुड्डा जी के निवास स्थान पर कांग्रेस पार्टी की नीतियों से प्रभावित होकर हरियाणा कांग्रेस प्रभारी श्री दीपक बावरिया जी,पूर्व मुख्यमंत्री एवं नेता प्रतिपक्ष चौधरी श्री @BhupinderShooda जी और हरियाणा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष चौधरी श्री… pic.twitter.com/doILLq2Tpk
— Sonia Doohan (@DoohanSonia) August 6, 2024
कोण आहेत सोनिया दुहान
अजित पवारांच्या सकाळच्या शपथविधीमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीत असताना त्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्या मूळच्या हरियाणामधील हिसारच्या रहिवासी होत्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या. युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community