Paris Olympic 2024 : नीरजचा अंतिम सामना कधी होणार?

181
Paris Olympic 2024 : नीरजचा अंतिम सामना कधी होणार?
Paris Olympic 2024 : नीरजचा अंतिम सामना कधी होणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताला टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने अपेक्षेप्रमाणेच पॅरिसमध्येही भालाफेकीत सहज अंतिम फेरी गाठली आहे. विशेष म्हणजे नीरजने या हंगामातील सर्वोत्तम कामगिरीचं प्रदर्शन करताना ८९.३४ मीटरची भालाफेक साधली आहे.  नीरज चोप्रा (Neeraj Chopra) समोर पाकिस्तानचा खेळाडू  अर्शद नदीम याचं देखील आव्हान असेल. नीरज चोप्रा ब गटात पहिल्या स्थानावर राहिला. केवळ एकाच प्रयत्नात नीरज चोप्रानं अंतिम फेरीत धडक दिली. (Paris Olympic 2024)

आता नीरजसमोर टोकयोतील सुवर्ण पदक राखण्याचं आव्हान असेल. आणि त्याची अंतिम लढत ही ८ ऑगस्टला होणार आहे. भालाफेक स्पर्धेत पात्रता फेरीच्या ब गटातून भारताचा खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra), ग्रेनाडाचा ए. पीटर्स आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम देखील अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- शरद पवारांच्या निकटवर्तीय Sonia Duhan यांची पंजाला साथ; Congress मध्ये केला प्रवेश)

नीरज चोप्रानं ८९.३४ मीटर भाला फेकला. तर, ए. पीटरनं ८८.६३ मीटर भाला फेकला. याशिवाय पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं ८६.५९ मीटर अंतरावर भाला फेकण्यात यश मिळवलं. नीरज चोप्रा, ए पीटर आणि अर्शद नदीम हे तिघे पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. (Paris Olympic 2024)

टोकयोमध्ये नीरजने ७ ऑगस्टलाच सुवर्ण जिंकलं होतं. आता पॅरिसमध्ये त्याचा अंतिम सामना हा ८ ऑगस्टला होणार आहे. टोकयो नंतर नीरज ज्या स्पर्धांमध्ये खेळला तिथे तिथे त्याने पहिल्या तीनांत स्थान मिळवलं आहे. पण, ऑलिम्पिकचं आव्हान मोठं असणार आहे. आणि मधल्या काळात दोन खेळाडूंनी ९० मीटरची भालाफेक करून दाखवली आहे. त्यामुळे नीरज अंतिम फेरीत ९० मीटरची भालाफेक करू शकतो का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : विनेशने अंतिम फेरी गाठल्यावर अभिनेत्री कंगना रनौतची सोशल मीडिया पोस्ट का चर्चेत आहे? )

भारताला नीरज चोप्राकडून (Neeraj Chopra) सुवर्णपदकाची आशा आहे. सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीची लढत ८ ऑगस्टला रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी होणार आहे. भारतातील सर्व नागरिकांचं लक्ष नीरज चोप्राकडे लागलं आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.