खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने Bademian Restaurant ला लावला 12 लाखांचा चुना; 200 प्लेट बिर्याणी फस्त

257
खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने Bademian Restaurant ला लावला 12 लाखांचा चुना; 200 प्लेट बिर्याणी फस्त
खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने Bademian Restaurant ला लावला 12 लाखांचा चुना; 200 प्लेट बिर्याणी फस्त
खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या नावाने कुलाब्यातील बडेमिया (Bademian Restaurant) मधून २०० प्लेट बिर्याणीची ऑर्डर, बडेमिया मालकाच्या मुलीला लॉ कॉलेजात प्रवेश मिळवुन देण्याच्या नावाखाली १२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला काळाचौकी पोलिसांनी  वांद्र्यातून अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीने खासदार सावंत यांच्या स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून ही फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे, यापूर्वी देखील त्याने अनेक बड्या नेत्याच्या नावाचा वापर करून फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरज कलव (Suraj kalav) (३०)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, करीरोड येथे राहणारा सूरज याच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन गुन्हे विक्रोळीत एक आणि काळाचौकी येथे एक गुन्हा असे पाच फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे.
कुलाबा येथील प्रसिद्ध बडेमिया रेस्टॉरंटचे (Bademian Restaurant) मालक जमाल मोहम्मद यासीन शेख (Mohammad Yasin Shaikh) (५४) यांच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत मोहम्मद शेख यांनी असे म्हटले आहे की, सूरज नावाच्या व्यक्तीने शेखला फोन करून सावंत यांच्यासाठी जुलै महिन्यापासून अनेकवेळा जेवणाची ऑर्डर दिली. त्यापैकी एक ऑर्डर २०० प्लेट बिर्याणी आणि गुलाब जामुनची होती. शेख यांनी बिलाची चौकशी केली असता, खासदार सावंत हे सर्व बिले एकाच वेळी निकाली काढतील, असे फसवणूक करणाऱ्याने त्यांना सांगितले.
बडेमिया (Bademian Restaurant) चे मालक शेख यांनी यापूर्वी सावंत यांना जेवणाची ऑर्डर पुरवली होती, नंतर त्यांना त्याचे पैसे देखील मिळाले होते, त्यामुळे त्यांनी पार्सल पाठवण्यास तत्परतेने होकार दिला. अशा प्रकारे, त्याने सूरजने दिलेल्या ठिकाणांवर अनेक वेळा खाद्यपदार्थ पाठवले. एकदा, सूरजने त्याला सांगितले की [शिवसेना (यूबीटी) नेते] मिलिंद नार्वेकर यांनी एमएलसीची जागा जिंकली होती आणि म्हणून भायखळ्यातील पत्त्यावर २०० लोकांसाठी जेवण पाठवणे आवश्यक होते. या ऑर्डरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणी आणि गुलाब जामुन यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, सूरजने पुन्हा ४० लोकांसाठी जेवण मागवले,” काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.  त्यानंतर आरोपी सूरज याने शेख यांच्या मुलीला चर्चगेट येथील लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो,या साठी तो आमदार-खासदारांशी बोलून काम करून घेईल असे सूरजने सांगितले. कॉलेज ऍडमिशनसाठी त्याने प्रथम ३ लाख रुपयांची  देणगी घेतली . नंतर त्याने कॉलेजची फी, ट्रस्टीला पैसे भरण्यासाठी पैसे आणि इतर विविध कारणांसाठी ९.२७  लाख रोख आणि ऑनलाईन द्वारे घेतले असे  पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, पैशांचा व्यवहार करीरोड येथील भारत माता सिनेमागृहाजवळ झाल्यामुळे काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २०४  (लोकसेवक म्हणून), ३१६(२) (गुन्हेगारी विश्वासभंग) आणि ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काळाचौकी पोलिसांनी सूरज कलव याला करीरोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत खासदार अरविंद सावंत सोबत काहीही सबंध नाही, तसेच त्याने ऑर्डर केलेली २०० प्लेट बिर्याणी आणि गुलाबजाम हे मित्राच्या मुलाच्या वाढदिवसासाठी मागवून मित्राकडून त्याचे पैसे घेतले होते, तसेच इतर ४० प्लेट त्याने मित्रांना पार्टीसाठी मागवले होते अशी माहिती समोर आली आहे.सूरज नावाचा आपला कोणीही स्वीय सहाय्यक नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून संबंधित व्यक्तीला अटक करावी, असे सांगितले.
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.