Assembly Polls Seat Sharing : राज्यातील काँग्रेस नेत्यांना ‘बाय-पास’ करून ठाकरे थेट दिल्लीच्या दारी

174
Assembly Polls Seat Sharing : राज्यातील काँग्रेस नेत्यांना ‘बाय-पास’ करून ठाकरे थेट दिल्लीच्या दारी

लोकसभा निवडणुकीप्रमाणे उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांना डावलून थेट हाय कमांडच्या दारी हजेरी लावण्यासाठी दिल्ली गाठली आहे. यामुळे लोकसभेला सर्वाधिक जागा मिळूनही, विधानसभा जागावाटपात राज्यातील नेत्यांना पुन्हा एकदा उबाठाच्या मागे फरफटत जावे लागणार असण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Assembly Polls Seat Sharing)

जागावाटप-मुख्यमंत्री पद

लोकसभा निवडणुकीपूर्वी उबाठाने हीच रणनीती वापरत जागावाटापाची चर्चा थेट दिल्ली हाय कमांडशी करून ४८ पैकी तब्बल २१ जागा मिळवल्या तर त्यातील केवळ ९ जागांवर विजय मिळवला. याउलट काँग्रेसने लोकसभेच्या १७ जागा लढवत १३ निवडून आणल्या. यामुळे काँग्रेसच महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरला. मात्र उबाठाने आता केवळ जागाच नाही तर मुख्यमंत्री पददेखील ठाकरे यांच्याकडे कसे राहील, यासाठी गांधी परिवाराच्या दारी हालचाली सुरू केल्या आहेत. (Assembly Polls Seat Sharing)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : न्यायालयाच्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट; सरन्यायाधीशांवर आरोप)

सांगलीवरही चर्चा

उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी तसेच मुलगा आदित्य यांचे तीन दिवस दिल्लीला वास्तव्य असणार आहे. या दौऱ्यात ठाकरे काँग्रेस नेत्या सोनिया, राहुल गांधी आणि प्रियंका यांची भेट घेणार असून विधानसभेच्या जागावाटपाची तसेच सांगलीत काँग्रेसकडून झालेल्या बंडखोरीबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या ज्येष्ठ नेत्यांचे महत्त्व कमी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. (Assembly Polls Seat Sharing)

मुख्यमंत्री पदाचा चेहेरा ‘मविआ’ की ठाकरे?

उद्धव यांच्या पाठोपाठ महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनीदेखील दिल्लीला हजेरी लावली. ठाकरे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा असली तरी त्यांनी बुधवारी ७ ऑगस्टला दिल्लीतील पत्रकार परिषदेत थेट उत्तर देणे टाळले. शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहेरा कोणाचा वैयक्तिक नसेल तर महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहेरा असेल. तसेच ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असे ‘मविआ’चे ठरले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Assembly Polls Seat Sharing)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.