BMC : तात्पुरता पदभार, तरीही अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी घेतला आरोग्य विभागाच्या कामांचा आढावा

340
Hindustan Post Exclusive : हिंदुस्थान पोस्ट चा अंदाज खरा ठरला....डॉ शिंदे जागी डॉ. विपिन शर्माच
Hindustan Post Exclusive : हिंदुस्थान पोस्ट चा अंदाज खरा ठरला....डॉ शिंदे जागी डॉ. विपिन शर्माच

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली त्यांच्या मुळ खात्यात झाल्याने त्यांच्याकडील विविध पदांचा भार तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे तात्पुरत्या स्वरुपात विभागून देण्यात आला आहे. शिंदे यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत हा तात्पुरती पदभार असून विभागाला कामकाज करण्यासाठी तात्पुरती ही व्यवस्था आहे. मात्र, असे असतानाच अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी आपल्याकडील या तात्पुरती पदभार असलेल्या आरोग्य विभागाचा आढावा घेऊन संबंधित विभागाला निर्देश दिले. त्यामुळे बांगर यांच्याकडे या पदाचा तात्पुरतील पदभार आहे की कायमस्वरुपी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (BMC)

(हेही वाचा – Maritime Security साठी महाराष्ट्राला २८ बोटी, १९ सागरी पोलीस ठाणे व ३२ नाके)

मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सेवा पुरविणारी यंत्रणा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सज्ज व अधिक सतर्क ठेवा, त्यासोबतच रूग्णालयातील स्वच्छता, रूग्णसेवा, औषध पुरवठा, प्रसाधनगृहे आदी सुविधा नियोजनबद्धरित्या आणि काटेकोरपणे पुरवण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक बुधवारी महानगरपालिका मुख्यालयात त्यांनी घेतली. त्याप्रसंगी संबंधितांशी संवाद साधताना त्यांनी हे निर्देश दिले आहेत. या बैठकीला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण) डॉ. नीलम अंद्राडे, लोकमान्य टिळक सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, उपनगरीय रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार आणि संबंधित ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Hindu : भिवंडीतील जिहादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा)

ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, मुले यांना रुग्णालयातील विविध टप्प्यात लागणारा प्रतिक्षा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने अधिक सुव्यवस्थित नियोजन व त्यानुसार अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश बांगर यांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले. त्याचबरोबर रुग्णांना केस पेपर, ओपीडी, एक्स रे, सोनोग्राफी आणि औषध घेण्यासाठी लागणारा सरासरी कालावधी कमी करण्याच्या अनुषंगाने विविध स्तरावर उपाययोजना करण्याचेही निर्देश त्यांनी महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांना व उपनगरीय रुग्णालयांना दिले. या सुविधा देताना रांगेचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने ‘टोकन पद्धती’ सारख्या उपाययोजनांची शक्यता पडताळून पहावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच उपचारासाठी आलेल्या रुग्णांना पुरेशी आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना बांगर यांनी महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांना व उपनगरीय रुग्णालयांना दिल्या. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.