BMC School : महापालिका विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह तंत्र शिक्षण आणि कौशल्य शिक्षण देण्यावर भर

864
BMC School : महापालिका विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह तंत्र शिक्षण आणि कौशल्य शिक्षण देण्यावर भर

महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह तंत्रशिक्षण, कौशल्य शिक्षण देण्यावर यापुढे अधिक भर देण्यात येईल. पालकांनीही मुलांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. (BMC School)

New Project 2024 08 07T204438.478

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षेत उच्चतम गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व अधिकतम निकाल देणाऱ्या शाळांचा आणि मुख्याध्यापकांचा गुणगौरव सोहळा भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात बुधवारी ७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे बोलत होते. महानगरपालिकेच्या २४८ शाळांपैकी ७९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, उर्वरित १३५ शाळांचा निकालही ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. या शाळांमधील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षण, मुख्याध्यापकांचा गुणगौरव या सोहळ्यात करण्यात आला. याप्रसंगी आमदार यामिनी यशवंत जाधव, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदींसह अधिकारी, पालक, विद्यार्थी या सोहळ्यास उपस्थित होते. (BMC School)

(हेही वाचा – BMC : रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून रुग्णांसह नातेवाईकांना अरेरावीची भाषा नको, अभिजित बांगर यांनी दिला आरोग्य विभागाला डोस)

शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्षे खूप मोलाचे असते. या वर्षाचे यश आयुष्याला दिशा देते. शैक्षणिक अभ्यासक्रमासह मुलांना कौशल्य आणि तंत्रशिक्षण मिळाले तर त्यांच्या आयुष्याचा पाया भक्कम होतो. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही कौशल्य शिक्षण द्यायला हवे. या शिक्षणामुळे भविष्यात त्यांना विविध विभागांतील प्रगतीच्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि संपूर्ण यंत्रणा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी खूप प्रयत्न करतात. त्याच प्रयत्नांचे फलित म्हणजे आजचा हा गुणगौरव सोहळा असल्याचेही लोढा यांनी म्हटले आहे. (BMC School)

New Project 2024 08 07T204524.525

मी आणि यशवंत जाधव आम्ही दोघेही महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे हा गुणगौरव सोहळा पाहून विद्यार्थ्यांचे खूप कौतुक वाटते. या विद्यार्थ्यांचे गुण पाहून येत्या काळात महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी नक्की रांगा लागतील, असा विश्वास आमदार यामिनी यशवंत जाधव यांनी व्यक्त केला. तसेच शाळांची प्रगती, शिक्षक-मुख्याध्यापकांकडून होणारा गुणगौरव सोहळा पाहून आपल्याला पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घ्यावेसे वाटतेय, अशी भावना त्यांनी व्यक्त करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

(हेही वाचा – BMC : तात्पुरता पदभार, तरीही अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी घेतला आरोग्य विभागाच्या कामांचा आढावा)

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी म्हणाले, दहावी ही स्पर्धेची सुरुवात असते. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना अनेक गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यामुळे या यशाने हुरळून न जाता पुढील शिक्षणासाठी आणखी जोमाने अभ्यास करा. मात्र आपले आई-वडील, शिक्षकांचा सतत आदर करा, असेही सैनी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. (BMC School)

New Project 2024 08 07T204628.237

महापालिका उपायुक्त (शिक्षण) चंदा जाधव यांनीही, मी स्वत: महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे यश पाहून अभिमान वाटतो. अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही त्यांच्या मुलांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले, असे सांगून जाधव यांनी विद्यार्थ्यांसह पालकांचेही अभिनंदन केले. तसेच मुलींना अधिकाधिक शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनावा, अशा शब्दात आवाहनही केले. शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी प्रास्ताविक केले. दहावीत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आयुष जाधव (९७.४० टक्के), वरुण चौरेसिया (९७.२० टक्के), शगुन पटवा (९५.२० टक्के) या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांसह, गुणवंत शिक्षण आणि मुख्याध्यापकांचाही प्रशस्तिपत्र आणि चषक देवून याप्रसंगी गौरव करण्यात आला. (BMC School)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.