राणा दाम्पत्याला महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा… Abhijit Adsul यांचा इशारा

201
राणा दाम्पत्याला महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा... Abhijit Adsul यांचा इशारा

राणा दाम्पत्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे. त्यांनी आमचा स्वाभिमान दुखवू नये. आम्ही शिवसैनिक आहोत. भाजपने त्यामुळे राणा यांना समज द्यावी अथवा महायुतीतून बाहेर काढावे. अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घेण्यास भाग पडेल, असा थेट इशारा शिवसेना नेते कॅप्टन अभिजित अडसूळ (Abhijit Adsul) यांनी महायुतीतील उच्चपदस्थ नेत्यांना दिला. बाळासाहेब भवन येथे बुधवारी (७ ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यपालपदाच्या नियुक्तीतून वगळ्याने शिवसेना नेते आनंदराव अडसूळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. महायुतीत त्यामुळे चांगलीच खडाजंगी सुरू आहे. अमरावती मतदारसंघाच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची उडी घेत, अडसूळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. अभिजीत अडसूळ (Abhijit Adsul) यांनी राणा दाम्पत्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून दोन ते तीन वेळा माघार घेतली. आता केंद्रीय मंत्री शाह यांनी शब्द देऊन ही राज्यपाल पद आनंदराव आडसूळ यांना का दिले नाही? असा सवाल उपस्थित केला. भाजपकडून महायुतीत आमच्यावर अन्याय होतो आहे, अशी खंत अभिजीत यांनी व्यक्त केली. भाजपाने दिलेला शब्द पाळावा. राज्यपाल पदासाठी आम्ही आजही थांबायला तयार आहोत. मात्र शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी सडेतोड भूमिका अभिजीत यांनी मांडली.

(हेही वाचा – BMC School : महापालिका विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासह तंत्र शिक्षण आणि कौशल्य शिक्षण देण्यावर भर)

नवनीत आणि रवी राणा यांच्यामुळे अमरावतीमध्ये महायुतीत मतभेद निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील एकाही नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध नाहीत. उलट महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम ते सातत्याने करत आले आहेत. बच्चू कडू देखील राणा दाम्पत्यामुळे महायुतीतून दूर गेले आहेत. त्यामुळे राणांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीत वेगळा निर्णय घेऊ असा इशारा अडसूळ (Abhijit Adsul) यांनी दिला. आम्ही शिवसैनिक असून बाळासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले आहे. मात्र, आमच्या नेत्याबद्दल बोलून काही जण आमचा स्वाभिमान दुखवत असतील तर नक्कीच याचा विचार करू, असा इशारा दिला. राणा यांना छपरी आमदार अशी उपमा देत, टीकेची झोड उठवली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.