चिपळूण येथील बाजारपेठेत बुधवार, ७ ऑगस्ट रोजी उरण येथील लव्ह जिहादच्या (Love Jihad) घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने सुरु केली होती. मात्र त्याच वेळी अचानक हसीना परकार नावाची मुसलमान महिला त्या ठिकाणी आली आणि संतप्त होऊन आंदोलकांना शिवीगाळ करू लागली. परिणामी आंदोलक संतप्त झाले, त्यामुळे पोलिसांनी अखेर त्या मुसलमान महिलेला अटक करून पोलीस संरक्षणात पोलीस ठाण्यात नेले.
शिवीगाळ करून नंतर माफीचा बनाव
उरण येथे दाऊद शेख या धर्मांध मुसलमानाने तेथील हिंदू युवती यशश्री शिंदे हिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शेवटी तिचा निर्घृण खून केला. या लव्ह जिहादच्या (Love Jihad) घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दाऊद शेखला फाशी देण्याच्या मागणीसाठी चिपळूण बाजारपेठ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने आयोजित केली होती. त्यावेळी उपस्थित महिला आणि पुरुष कार्यकर्ते लव्ह जिहाद (Love Jihad) च्या विरोधात जोरदार घोषणा देत होते. त्याच वेळी एक हिजाब घातलेली मुसलमान महिला तावातावाने तिथे आली आणि तिने आंदोलकांना शिवीगाळ करणे सुरु केले, तसेच त्यांना आर्वाच्च बोलणे सुरु केली. मुसलमान जिंदाबाद अशा घोषणा देऊ लागली. आंदोलक संतप्त होताच तिने तेथून काढता पाय घेत हळूच एका दुकानात घुसून आश्रय घेतला, त्यावेळी पोलिसांनी तात्काळ त्या दुकानाच्या दरवाजाबाहेर गराडा घातला. त्यामुळे संतप्त कार्यकर्ते त्या महिलेजवळ पोहचू शकले नाही. मात्र कार्यकर्ते पोलिसांना त्या महिलेला तात्काळ अटक करा, अशी मागणी करू लागले. अखेर पोलिसांनी त्या महिलेले ताब्यात घेतले, त्यानंतर मात्र ती मुसलमान महिला हात जोडून पोलिसांना माझे रक्षण करा, अशी विनवणी करू लागली. पोलिसांनी अखेर त्या महिलेले सुरक्षित वातावरणात पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे तिला अटक केली.
Join Our WhatsApp Community