Assembly Seat Sharing : सेना-राष्ट्रवादीचा जागावाटपासाठी भाजपाकडे जोरदार पाठपुरावा

129
Assembly Seat Sharing : सेना-राष्ट्रवादीचा जागावाटपासाठी भाजपाकडे जोरदार पाठपुरावा
Assembly Seat Sharing : सेना-राष्ट्रवादीचा जागावाटपासाठी भाजपाकडे जोरदार पाठपुरावा

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा करण्यास विलंब झाल्याने काही उमेदवारांना प्रचारास पुरेसा वेळ मिळाला नाही आणि मोठा फटका बसला. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून महायुतीतील अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) आणि शिवसेना (Shiv Sena) यांनी भाजपाकडे (BJP) जागावाटपासाठी जोरदार पाठपुरावा लावला आहे. (Assembly Seat Sharing)

(हेही वाचा- Maharashtra Police Transfer: राज्यात पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे शहराला मिळाले तीन नवे पोलीस अधिकारी)

पवारांनी गाठली दिल्ली

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी ६ ऑगस्टच्या रात्री दिल्ली गाठली आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी जागावाटपासाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात येते. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेदेखील लवकरच दिल्ली दौरा करणार असून भाजपा नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. (Assembly Seat Sharing)

शिंदे लवकरच जाणार दिल्लीला

लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या विशेषतः शिवसेनेच्या काही जागा मतदानाच्या केवळ १५-२० दिवस आधी जाहीर झाल्याने उमेदवारांना प्रचाराला आणि विभागात बैठका, प्रचार फेऱ्या घेण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. नाशिकचे हेमंत गोडसे (Hemant Godse) , छत्रपती संभाजी नगरचे संदीपान भूमरे (Sandipan Bhumre), मुंबई उत्तर पश्चिममधील रवींद्र वायकर (Ravindra Waikar) या आणि अशा काही जागी उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाला होता. (Assembly Seat Sharing)

(हेही वाचा- ISTRO : स्वातंत्र्य दिनाला इस्त्रो प्रक्षेपित करणार ईओएस-8 उपग्रह)

विधानसभेला मात्र अशी वेळ येऊ नये यासाठी महायुतीतील दोन्ही मित्र पक्षांनी कंबर कसली असून लवकरात लवकर जागावाटप आणि उमेदवारी घोषित करण्याची घाई या पक्षांना लागली आहे. (Assembly Seat Sharing)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.