Pune Ammonia Gas Leak: पुण्यातील कारखान्यातून अमोनिया वायूची गळती सुरू, १७ कर्मचारी रुग्णालयात

115
Pune Ammonia Gas Leak: पुण्यातील कारखान्यातून अमोनिया वायूची गळती सुरू, १७ कर्मचारी रुग्णालयात
Pune Ammonia Gas Leak: पुण्यातील कारखान्यातून अमोनिया वायूची गळती सुरू, १७ कर्मचारी रुग्णालयात

पुणे शहराजवळ असलेल्या यवत येथील एका फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये अमोनिया वायूची गळती (Pune Ammonia Gas Leak) सुरु झाली आहे. यामुळे १७ कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. या १७ जणांमध्ये एक महिला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला आयसीयूमध्ये ठेवले आहे. यवतजवळील भाडगाव येथे बुधवारी सकाळी रेडी-टू-ईट फूड प्रोसेसिंग यूनिटमध्ये ही घटना घडली.

(हेही वाचा –Ceropegia Shivarayina : विशाळगडावर सापडली नवी वनस्पती; शिवाजी महाराजांचे दिले नाव)

कंपनीतील कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्वरीत कंपनीत तपासणी करण्यात आली. त्यावेळी अमोनिया वायूची गळती सुरु असल्याचे लक्षात आले. मुख्य रेग्यूलेटर त्वरीत बंद करण्यात आले. त्यामुळे मोठा अपघात टळला. अमोनियाचा त्रास झालेल्या 17 पैकी 16 कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु आयसीयूमध्ये दाखल असलेल्या महिलेवर उपचार सुरु आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या टीमने कंपनीत जाऊन गॅस लीक होण्याच्या प्रकरणाची तपासणी केली. तसेच कंपनीत करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची पाहणी केली. (Pune Ammonia Gas Leak)

(हेही वाचा –चिपळूणमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या Love Jihad विरोधी आंदोलनाच्या ठिकाणी मुसलमान महिलेची शिवीगाळ; वातावरण तणावग्रस्त)

पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांनी सांगितले की, रेडी-टू-ईट खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीत अमोनिया गॅसचा वापर केला जातो. त्यासाठी त्या ठिकाणी 18 डिग्री सेल्सियस तापमान ठेवले जाते. त्या कारखान्यात घटना घडली तेव्हा 25 जण काम करत होते. त्यातील 17 जण अमोनिया गॅसची गळती होणाऱ्या भागाच्या जवळ होते. यामुळे सर्वांना त्रास झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Pune Ammonia Gas Leak)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.