-
ऋजुता लुकतुके
वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) विनेश फोगाटला बाहेर पडावं लागलं. त्याचवेळी ५३ किलो वजनी गटातील भारताची कुस्तीपटू अंतिम पंघालवर (Antim Panghal) पराभवाबरोबरच शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. पहिल्या फेरीत फक्त ५६ सेकंदांत अंतिमचा पराभव झाला. शिवाय बेशिस्त वागणुकीसाठीही तिच्यावर कारवाई झालीय. शेवटी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने तिला तिच्या सपोर्ट स्टाफसह तातडीने भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा- grand island : गोव्यामध्ये ग्रॅंड आयलॅंड कुठे आहे? आणि तिथे तुम्ही काय काय धम्माल करु शकता?)
अंतिम आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिमने ज्या गावात सामना सुरू होता, तिथून आपलं काही सामान आणण्यासाठी स्वतःचं अधिकृत ओळखपत्र तिच्या छोट्या बहिणीला दिलं आणि सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं. अशा परिस्थितीत फ्रेंच अधिकाऱ्यांनी अंतिमच्या (Antim Panghal) बहिणीला ताब्यात घेतलं. दिवसभर तिला स्थानिक पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. अखेर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला हस्तक्षेप करावा लागला. कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहीण आणि सपोर्ट स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Paris Olympic 2024)
खरंतर, महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील आपला पहिला सामन्यात गमावल्यानंतर कुस्तीपटू अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली. तिचे प्रशिक्षक भगतसिंह (Bhagat Singh) आणि विकास ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे ती गेली. तिनं आपल्या बहिणीला स्वतःचं ओळखपत्र दिलं आणि जिथे सामना होता, तिथून आपलं सामना आणण्यास सांगितलं. अंतिमचं ओळखपत्र घेऊन बहीण स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली खरी, पण अंतिमचं सामना घेऊन परतताना तिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- विधानसभेतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर Ajit Pawar काय म्हणाले?)
अंतिमच्या बहिणीची पोलिसांनी चौकशी केली आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर १९ वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटू अंतिमलाही तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावलं. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. तर अंतिमचे एक प्रशिक्षक भगत कथितरित्या पॅऱिसमध्ये मद्यधुंद अवस्थेत पकडले गेले आहेत. त्यामुळे अंतिमच्या अडचणीत आणखी वाढ झाली. (Paris Olympic 2024)
अखेर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community