पिंपरी – चिंचवड  औद्योगिक  भागात  कोहिनूर  वर्ल्ड  टॉवर्सची उभारणी!

वर्ल्ड टॉवर्स (KWT) हा जागतिक दर्जाच्या व्यवसायांकरिता सिग्नेचर लँडमार्क असून जगभरात मापदंड ठरलेल्या कार्यालयीन जागांची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

160

पुण्यातील वेगाने वाढणारा कोहिनूर ग्रुप हा पुण्यातील अग्रेसर रियल इस्टेट समूह असून पुण्यातील पिंपरी – चिंचवड भागात कोहिनूर वर्ल्ड टॉवर्सची घोषणा करण्यात आली. कोहिनूर वर्ल्ड टॉवर्समध्ये या भागामधील सर्वात मोठ्या व्यावसायिक जागांचा समावेश ज्यामध्ये ए ग्रेड ऑफिस स्पेसेस, हाय स्ट्रीट रिटेल, अलफ्रेस्को आणि पिंपरीतील सर्वोत्तम दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. भविष्यातील विकासासह मुख्य प्रकल्प 1.8 दशलक्ष चौ. फूट जागेवर विस्तारलेला आहे. कोहिनूर वर्ल्ड टॉवर्स (KWT) हा जागतिक दर्जाच्या व्यवसायांकरिता सिग्नेचर लँडमार्क असून जगभरात मापदंड ठरलेल्या कार्यालयीन जागांची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवकल्पकता आणि प्रभावी यांच्या मिलाफ असलेल्या विक्री आणि मनोरंजक विषयक जागा या लक्षवेधी इमारतींमधील प्रमुख घटक आहे. हे टॉवर्स शाश्वत बांधकामाची उच्चतम मानके आणि आयजीबीसी गोल्ड रेटेड बिल्डींग्ससह बांधले आहेत.  याठिकाणी 5 लेव्हल पार्किंग, कॅफेटेरिया, क्लब हाउसेस, रुफटॉप लाउंज, वातानुकूलित लॉबींची सोय आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय अग्निरोधक आणि संरक्षण यंत्रणा, सीसीटीव्ही तसेच स्मार्ट कार्ड एन्ट्रीजची तजवीज करण्यात आली आहे.

(हेही वाचा : भाजपचा शिवसेनेविरोधात फटकार मोर्चा! सेना भवनसमोर राडा)

 ग्लोबल आर्किटेक्चर फर्मचे टॉवर डिझाईन! 

कोहिनूर वर्ल्ड टॉवर्सचे बांधकाम एच* आर्किटेक्चर, या ग्लोबल आर्किटेक्चर फर्मने केले असून जगभरात त्यांना त्यांच्या संकल्पना आणि डिझाईनकरिता ओळखले जाते. त्यांचे टॉवर डिझाईन हे डोळ्यांना लुभावणारे आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते. या टॉवर्समध्ये भुरळ पाडणारे लँडस्केपिंग टॉवर्स डिझाईन करताना हरीत क्षेत्र इमारतींचा अविभाज्य भाग असल्याचे लक्षात येते. या इमारती निसर्गाच्या सान्निध्यात असल्याची जाणीव करून देतात.

देशातील पथदर्शी प्रकल्प मानला जातो!

आपण महासाथीनंतरच्या विश्वात पाऊल ठेवत असून कामाच्या आणि व्यवसाय गरजा लक्षात घेऊन ‘कोहिनूर वर्ल्ड टॉवर्स’चे बांधकाम केले आहे. हा केवळ एक पत्ता नसून शहरातील व्यवसायांकरिता एक सिग्नेचर अॅड्रेस ठरणार आहे. आदर्श डिझाईन आणि स्थापत्यशास्त्र यांच्यासमवेत कोहिनूर वर्ल्ड टॉवर्स व्यावसायिक उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास मदत करतील. कनेक्टीव्हिटी पाहिल्यास, हा प्रकल्प पिंपरीच्या व्यावसायिक बाजारपेठ, पुणे आणि अन्य शहरी भागाला चांगल्याप्रकारे जोडलेला आहे. ज्यामुळे हा देशातील पथदर्शी प्रकल्प मानला जातो. हे टॉवर्स पीसीएमसी पटलाची आणि त्याच्या व्यवसाय परीघाच्या व्याख्या नव्याने रचतील आणि पिंपरीचा नवीन मापदंड निर्माण करतील, असे कोहिनूर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.