पक्ष वाचवण्यासाठी Uddhav Thackeray यांचे राहुल गांधींकडे रडगाणे

220
पक्ष वाचवण्यासाठी Uddhav Thackeray यांचे राहुल गांधींकडे रडगाणे
पक्ष वाचवण्यासाठी Uddhav Thackeray यांचे राहुल गांधींकडे रडगाणे
  • वंदना बर्वे
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला पराभूत करायचे असेल तर काँग्रेसने (Congress) पक्षातील नेत्यांना आवर घालणे खूप गरजेचे आहे, अशी सल्लावजा विनवणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्ली दरबारात केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
(हेही वाचा- Amravati News : कत्तलीसाठी जात असलेल्या १३ गोवंशांना जीवनदान)
काँग्रेसमधील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर “हिंदुस्थान पोस्ट”ला दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना (उबाठा? प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्ली दरबारात बरेच नमते घ्यावे लागले आहे. ठाकरे सध्या तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी सुनीता केजरीवाल (Sunita Kejriwal) यांना भेट घेतली.  शिवाय, सायंकाळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत.
उद्धव राहुल खरगे यांना भेटले
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कालपासून काँग्रेस (Congress) नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची मोहीम सुरु केली आहे. काल त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती
.
(हेही वाचा- Bangladesh Protests : अस्थिरता संपल्याशिवाय कांदा निर्यात नाही; महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांचा निर्णय)
शिवसेनेचे अस्तित्व संपण्याची भीती
मुळात, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होण्यापासून वाचण्याकरिता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काँग्रेस नेत्यांच्या दरबारात लोटांगण घालत असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. स्वबळावर विजय मिळविता येणार नाही. किंबहुना पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नाचिन्ह निर्माण होऊ शकते अशी भीती ठाकरे यांना आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे यांच्या पक्षाला फक्त नऊ जागावर विजय मिळाला होता. हा विजय सुद्धा मुस्लिमांची मते मिळाल्यामुळे झाला. काँग्रेसची (Congress) मुस्लिम मते मिळाली नसती तर तीन चार जागा निवडून आल्या असत्या याची जाणीव ठाकरे यांना झाली असावी. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा- pizhichil : काय आहे पिज्हिचिल थेरपी आणि काय आहेत या थेरपीचे दुष्परिणाम?)

कदाचित म्हणूनच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेसचे लांगुलचालन करायला सुरवात केली आहे. अशात, काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची गळचेपी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात ठाकरे काँग्रेस (Congress) दरबारी स्वतःला किती वाकतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.