आगामी विधानसभा निवडणुकीत जनता उबाठा गटाला घरी पाठवणार – Raosaheb Danve

114
आगामी विधानसभा निवडणुकीत जनता उबाठा गटाला घरी पाठवणार - Raosaheb Danve
आगामी विधानसभा निवडणुकीत जनता उबाठा गटाला घरी पाठवणार - Raosaheb Danve

आगामी विधानसभा निवडणुकीत जनता उबाठा गटाला (UBT Group) घरी पाठवेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी गुरुवारी व्यक्त केला. रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) खिल्ली उडवत आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी दिल्लीला जावे लागेले, असे विधान केले. (Raosaheb Danve)

(हेही वाचा – Amravati News : कत्तलीसाठी जात असलेल्या १३ गोवंशांना जीवनदान)

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजपा आणि शिवसेनेची युती असताना जागावाटपाबाबत चर्चा ही मातोश्री बंगल्यावर होत असे. भाजपाकडून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे मातोश्री बंगल्यावर जायचे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा व्हायची पण आता उद्धव ठाकरेंना जागावाटपाबाबत दिल्लीत जावे लागत आहे. उद्धव ठाकरेंनी आपली पातळी इतकी खालावल्याचे राज्यातील जनता पाहत आहे.  

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : अविनाश साबळेचं पदकाचं स्वप्न हुकलं)

दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ एक दिवस मंत्रालयात गेले होते. उद्धव ठाकरेंनी जनहिताच्या योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे जनहिताची कामे ठप्प झाली. राज्यातील जनतेने हे सर्व पाहिले आहे, त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता उद्धव ठाकरेंना नाकारेल. यावेळी प्रदेश प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्याय, प्रादेशिक समन्वयक विश्वास पाठक, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. (Raosaheb Danve)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.