Ind vs SL, ODI Series : टी-२० प्रभावामुळे भारतीय संघ हरला का? प्रश्नावर रोहितचं बाणेदार उत्तर

Ind vs SL, ODI Series : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने लंकन फिरकीपटूंसमोर नांगी टाकली.

142
Ind vs SL, ODI Series : टी-२० प्रभावामुळे भारतीय संघ हरला का? प्रश्नावर रोहितचं बाणेदार उत्तर
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका ०-२ ने गमावली. बुधवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा ११० धावांनी पराभव केला. मालिकेतील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला पहिला प्रश्न पत्रकारांनी केला तो म्हणजे, टी-२० च्या प्रभावामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला का? या प्रश्नाला रोहितने ताठपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, जेव्हा तुम्ही भारतीय संघासाठी खेळत असता त्यावेळी असं काही घडत नाही, असा प्रश्न म्हणजे विनोद आहे. तुम्ही जेव्हा भारतासाठी खेळता तेव्हा आत्मसंतुष्टता असं काही नसतं. एका पराभवामुळे आमची योग्यता ठरवू नका. श्रीलंकेच्या संघानं आमच्या पेक्षा चांगला खेळ केला, त्यांना विजयाचं श्रेय दिलं पाहिजे, असं रोहित शर्मा म्हणाला. (Ind vs SL, ODI Series)

रोहित शर्मा पुढे म्हणाला की आमच्यासमोर काही समस्या आहेत. आम्हाला गांभीर्यानं वैयक्तिक गेम प्लानवर लक्ष द्यावं लागेल. आम्ही काही काळ दबावात होतो, आम्ही इथं प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीलंकेनं या मालिकेत चांगला खेळ केला. त्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल, असंही रोहित शर्मा म्हणाला.

(हेही वाचा – Japan Earthquake: जपान हादरलं! रिश्टर स्केलवर ७.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद, त्सुनामीचाही इशारा)

चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघाला फक्त ६ एकदिवसीय सामने मिळणार आहेत. त्यादृष्टीने संघ बांधणीसाठी या मालिकेकडे भारतीय संघ प्रशासनाचं लक्ष होतं. त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळेल याचा जास्त विचार झाला. गौतम गंभीर तसंच रोहितने यापूर्वी तसं स्पष्टही केलं होतं.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. तर, दुसऱ्या सामन्यात भारताचा ३२ धावांनी पराभव झाला. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा तब्बल ११० धावांनी पराभव करून श्रीलंकेनं ही मालिका ११० धावांनी जिंकली. श्रीलंकेनं भारतावर २७ वर्षानंतर मालिका विजय मिळवला. श्रीलंकेचा युवा खेळाडू दुनिथ वेल्लालगे यानं तीनही सामन्यांमध्ये अष्टपैलू कामगिरी करत स्पर्धावीराचा पुरस्कार जिंकला. (Ind vs SL, ODI Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.