नवी दिल्ली मधील जिल्हा पोलिसांनी संसद भवनाबाहेर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना विशेष ड्युटी कार्ड जारी केले आहेत. सात महिन्यांपूर्वी संसद भवनाच्या आतील आणि बाहेरील सुरक्षेतील त्रुटींनंतर पोलीस प्रशासन अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
संसद भवनाभोवती कडेकोट सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी केले आहे. घुसखोरी आणि निषेधांसह कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांची भूमिका असणार आहे. (Parliament Security)
(हेही वाचा – पक्ष वाचवण्यासाठी Uddhav Thackeray यांचे राहुल गांधींकडे रडगाणे)
स्पेशल ड्युटी कार्ड
पोलिसांची प्रत्येक माहिती या ड्युटी कार्डमध्ये उपलब्ध आहे. अनेकदा सुरक्षेमध्ये निष्काळजीपणाच्या घटना घडल्यात. त्यांची गांभीर्याने दखल घेऊन सुरक्षा यंत्रणांनी हा निर्णय घेतला आहे.
संसदेतील सुरक्षेनंतर घेतला निर्णय
सभागृहात रंगीत फटाक्यांमधून पिवळा धूर सोडत घोषणाबाजी केल्याची घटना घडली होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विविध सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्या आहेत.
संसद भवनाभोवती कडेकोट सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी केले आहे. घुसखोरी आणि निषेधांसह कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांची भूमिका असणार आहे. (Parliament Security)
(हेही वाचा – Amravati News : कत्तलीसाठी जात असलेल्या १३ गोवंशांना जीवनदान)
ड्युटी कार्डमध्ये सर्व माहिती
त्यांचे कर्तव्य कोणते आहे आणि त्यांना काय करावे लागेल आणि काय नाही याची प्रत्येक माहिती या ड्युटी कार्डमध्ये उपलब्ध आहे. अनेकदा सुरक्षेमध्ये निष्काळजीपणाच्या घटना घडल्यात. त्यांची गांभीर्याने दखल घेऊन सुरक्षा यंत्रणांनी हा निर्णय घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनात स्पेशल ड्युटी कार्ड घालणार
पावसाळी अधिवेशनात संसद भवनाभोवती कर्तव्य बजावणारे पोलिस हे विशेष ड्युटी कार्ड त्यांच्या गळ्यात घालतील. ही कार्डे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असलेल्या टीम्सची कर्तव्ये परिभाषित करतात. दिल्ली पोलीस आता संसदेच्या अंतर्गत सुरक्षेचा भाग नाही, परंतु इतर महत्त्वाची सुरक्षा जबाबदारी त्यांच्यावर आहे. (Parliament Security)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community