RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय

RBI MPC Meeting : सलग आठव्यांदा रेपो दर तसेच ठेवण्यात आले आहेत.

103
RBI on Food Inflation : रिझर्व्ह बँकेच्या न्यूजलेटरमध्येही अन्नधान्याच्या वाढत्या महागाईवर चिंता
  • ऋजुता लुकतुके

आरबीआयने आपले नवे पतधोरण जाहीर करताना रेपो दरात कुठलाही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या हा दर ६.५० टक्क्यांवर कायम असेल. गुरुवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले. पतधोरणाच्या बैठकीत सहा पैकी चार सदस्यांनी रेपोदर जैसे थे ठेवण्याच्या बाजूने कौल दिल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं. (RBI MPC Meeting)

याआधी गेल्या महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटच्या दरावर भाष्य केलं होतं. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि महागाई दर लक्षात घेता व्याज दरात कपात करण्याबाबात सध्याच निर्णय घेणे थोडे घाईचे ठरेल. भारतासह सध्या संपूर्ण जगात आर्थिक पातळीवर अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत व्याजदराच्या कपातीबाबत सध्याच चर्चा करणे योग्य नाही. आरबीआयने महागाई दर चार टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. तर प्रत्यक्ष मात्र महागाई दर ५ टक्क्यांपेक्षा पुढे गेलेला आहे, असे तेव्हा शक्तिकांत दास म्हणाले होते. (RBI MPC Meeting)

(हेही वाचा – Parliament Session : रवींद्र वायकरांनी मुंबईकरांच्या प्रश्नांना फोडली वाचा)

आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची प्रती दोन महिन्यांनी आयोजित केली जाणारी चलनविषक धोरण ठरवणारी तिसरी बैठक पार पडली. ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत ही बैठक झाली. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखील एकूण सहा सदस्य असलेल्या बैठकीत रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (RBI MPC Meeting)

रेपो रेटमध्ये बदल झाल्यास तुमच्या घर, वाहन तसेच अन्य कर्जाच्या हप्त्यांत बदल होतो. यावेळी आरबीआयने रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्यांत वाढ होणार नाही किंवा घटही होणार नाही. (RBI MPC Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.