Mukhyamantri Ladki Bahin : दादा आणि भाई यांच्यात ‘लाडक्या बहिणी’वरून श्रेयवादाची लढाई

179
Mukhyamantri Ladki Bahin : दादा आणि भाई यांच्यात ‘लाडक्या बहिणी’वरून श्रेयवादाची लढाई

महाविकास आघाडीतील काँग्रेस-शिवसेना उबाठा-राष्ट्रवादी काँग्रेस (शप) दिल्लीत बसून राज्यातील सत्तेची गणिते मांडत असताना महायुतीतील ‘दादा’ आणि ‘भाई’ यांच्या श्रेयवादाच्या लढाईची जोरदार चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे. (Mukhyamantri Ladki Bahin)

भाजपा, राष्ट्रवादीत चलबिचल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करत असताना ‘लाडकी बहीण’ योजनेतून ‘मुख्यमंत्र्यां’नाच वगळले आणि केवळ ‘माझी लाडकी बहीण’ असा प्रचार करत बहीणींची मते मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही योजना केवळ शिवसेनेची असल्यासारखी जाहिरात करत असल्याने भाजपा आणि राष्ट्रवादीत चलबिचल असल्याचे सांगण्यात येते.

(हेही वाचा – Pune Metro : स्वारगेट ते कात्रज मेट्रोला मिळणार गती)

’दादां’चा अर्थमंत्री म्हणून श्रेय घेण्याचा प्रयत्न

अजित पवार हे ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. या जनसन्मान यात्रेची सुरुवात गुरुवारी ८ ऑगस्टला नाशिक येथील दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झाली. यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या जाहिरातीत लाडकी बहीण योजनेचा प्रचार ठळकपणे करण्यात आला असल्याचे दिसून आले. मात्र योजनेचं नाव लिहिताना ‘मुख्यमंत्री’ हा शब्द ‘दादां’नी वगळल्याचे दिसले. त्यामुळे ’दादां’नी अर्थ मंत्री म्हणून या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

नाव बदलणे ‘भाई’च्या नेत्यांना आवडले नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यात्रेत गुलाबी रंगाच्या अनेक बस तयार ठेवण्यात आल्या होत्या तर काही एसयूव्हीदेखील होत्या. त्या सगळ्या गाड्या गुलाबी रंगाच्या होत्या आणि त्यावर ‘माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Ladki Bahin) असा उल्लेख करण्यात आला होता. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही योजना अर्थसंकल्पांत जाहीर केली असली तरी योजनेचे नाव बदलणे ‘भाई’च्या नेत्यांना आवडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाई म्हणून ओळखले जाते.

(हेही वाचा – RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय)

महायुतीतील अंतर्गत धुसपुस, जनतेत चर्चा

शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यावर टीका करत काहींना मुख्यमंत्री हा शब्द आवडत नसावा असा टोला अजित पवार यांना लगावला. शिंदे सेनेच्या कार्यक्रमांमध्ये योजनेच्या नावाचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ असा करण्यात येतो तर अजित पवार गटाचे नेते ‘माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Ladki Bahin) असा या योजनेचा उल्लेख करत असल्याने महायुतीतील अंतर्गत धुसपुस जनतेत चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.