Kolhapur : कोल्हापुरातील प्रसिद्ध, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक

133
Kolhapur : कोल्हापुरातील प्रसिद्ध, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक
Kolhapur : कोल्हापुरातील प्रसिद्ध, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक

कोल्हापुरातील (Kolhapur) प्रसिद्ध नाट्यगृह अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला (Keshavrao Bhosle Theatre) गुरुवारी रात्री आग लागली. आगीच्या प्रचंड ज्वालांनी नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. रंगमंचापर्यंत आग पसरली, यामुळे नाट्यगृह नामशेष झाले असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे.

(हेही वाचा –केवळ सत्तेत येण्यासाठी विरोधक भारताचाही Bangladesh होण्याकरता हापापले; काय म्हणत आहेत काँग्रेसचे नेते?)

केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याचे कळताच कलाकारांनी नाट्यगृहाकडे धाव घेतली. मात्र, कलाकरांना गेटच्या आतमध्ये सोडले नाही. या आगीमुळे नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले असून सर्व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत.छत्रपती संभाजीराजेंनी या आगीच्या घटनेबाबत पोस्ट करत कोल्हापूर कलाक्षेत्रातला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. (Kolhapur)

(हेही वाचा –Maharashtra CM Face : उद्धव ठाकरेंच्या चेहेऱ्याला शरद पवारांचा विरोध?)

राजर्षी शाहू महाराज यांनी खासबाग मैदान व थिएटरची उभारणी केली होती. शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे. थिएटरला लागलेल्या आगीमुळे नागरिकांतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे. त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जात आहे. केशवराव भोसले नाट्यगृहावर कोट्यवधींचा खर्च देखील करण्यात आला आहे. (Kolhapur)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.