National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) कडून 70 अत्यावश्यक औषधं आणि 4 विशेष औषधांच्या किंमतींमध्ये कपात करण्याचा निर्णय झाला आहे. ही औषधं प्रामुख्याने लाईफस्टाईलशी निगडीत आजारांची आहे.ज्यात पेन किलर, ताप, संसर्ग, डायरिया, मसल्स पेन, अॅहन्टिबायोटिक्स, मधूमेह, रक्तदाब आणि हृद्याशी निगडीत आजारांचा संबंध आहे. यासोबत विशेष औषधांमध्ये काही अॅलन्टीबायोटिक्स, मल्टिव्हिटॅमिन्स, कॅनसर, मधूमेह आणि हार्ट शी निगडित औषधांचादेखील समावेश आहे.
सर्वसामान्यांसाठी अनेक आजारांवरील उपचार स्वस्त होणार
जून 2024 च्या सुरूवातीला सरकारने 54 फॉर्म्युलेशन आणि 8 आवश्यक औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत. NPPA च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक अत्यावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी अनेक आजारांवरील उपचार स्वस्त होणार आहेत.
NPPA देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किंमती नियंत्रित करते. ज्याचा वापर सामान्य लोक विविध रोगांवर उपचार करण्यासाठी करतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community