Delhi Police : पुणे ISIS मॉड्यूल संबंधित वाँटेड दहशतवादी रिझवान अटकेत

122
Delhi Police : पुणे ISIS मॉड्यूल संबंधित वाँटेड दहशतवादी रिझवान अटकेत
Delhi Police : पुणे ISIS मॉड्यूल संबंधित वाँटेड दहशतवादी रिझवान अटकेत

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) इसिसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल (Rizwan Abdul) याला अटक केली आहे. रिझवान हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मोस्ट वाँटेड यादीत होता. रिझवानवरती तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस ठेवण्यात आले होते. रिझवान हा पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित होता. याशिवाय अन्य दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग तपासला जात आहे.

UAPA अंतर्गत एफआयआर नोंदवला
दिल्ली-फरिदाबाद सीमेवरून रिझवानला शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आल्याची माहिती आहे. UAPA अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते. त्यापैकी एक शाहनवाज याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती, तर अब्दुल्ला उर्फ ​​डायपरवाला अद्याप फरार आहे. (Delhi Police)

एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत दहशतवादी रिजवान अलीचा समावेश
एनआयएच्या (NIA) मोस्ट वाँटेड यादीत दहशतवादी रिजवान अलीचा समावेश होता. पुणे ISIS मॉड्यूलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलिस आणि NIA ने यापूर्वी अटक केली होती. या वर्षी मार्चमध्ये दहशतवाद विरोधी एजन्सीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवानच्या नावासह अन्य तीन आरोपींचाही समावेश होता. एनआयएने पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात एकूण 11 आरोपींवर आरोप ठेवले आहेत. हे प्रकरण पुण्यातील महाराष्ट्रातील ISIS शी संबंधित शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि साहित्य जप्त करण्याशी संबंधित आहे. (Delhi Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.