राज्यसभेच्या कामकाजाच्या वेळी जया बच्चन आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक खटके उडाले आहेत. या वेळी उपराष्ट्रपतींनी जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी सुनावले.
उपसभापती धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असा उल्लेख करताच जया बच्चन यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, “मला जया अमिताभ बच्चन बोलावलेले नको आहे. मी अभिनेत्री आहे. माझी समाजात प्रतिष्ठा आहे. मी बॉडी लँग्वेज आणि चेहऱ्यावरील हावभाव दोन्ही समजते. तुमचा टोन योग्य नाही.”
(हेही वाचा – Shirdi International Airport: शिर्डी विमानतळ जप्त होणार? काय आहे प्रकरण?)
यानंतर विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. उपराष्ट्रपतींनीही परखड भूमिका घेत जया बच्चन यांना सुनावले. उपराष्ट्रपती म्हणाले, प्रतिष्ठा केवळ तुमची नाही. येथे बसलेल्या प्रत्येकाची आहे.त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक बोला. तुम्ही कितीही मोठ्या सेलिब्रेटी असलात, तरीही संसदेत तुम्हाला नियमांचे पालन करावेच लागेल.”
“आजचा दिवस दुःखद आहे”, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत विरोधकांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला आहे. आधीही राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड (Jagdeep Dhankar) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यात याच विषयावरून वाद झाला होता.
हेही पहा –