गणेशभक्तांचा कोकण प्रवास करणार खड्डेमुक्त; Nitin Gadkari यांचे वायकरांना आश्वासन

भोस्ते व परशुराम घाट येथे टनेल अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता बांधण्याचीही रविंद्र वायकरांनी नितीन गडकरींकडे केली मागणी.

178
गणेशभक्तांचा कोकण प्रवास करणार खड्डेमुक्त; Nitin Gadkari यांचे वायकरांना आश्वासन

गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर यांना दिले.

(हेही वाचा – कितीही मोठ्या अभिनेत्री असाल, नियमांचे पालन करावे लागेल; Jaya Bachchan यांना उपराष्ट्रपतींनी सुनावले)

मुंबई गोवा राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरु आहे. ४७१ कि. मी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु करण्यात आले. अद्याप हे काम पूर्ण झाले नसून या कामाला विलंब होत आहे. या राज्य मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. अद्याप या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे, त्यातील अनेक ठिकाणांवरील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या राज्य महामार्गावरून प्रवास करताना प्रवाश्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डे मुक्त करवा, असे निवेदन खासदार रविंद्र वायकर यांनी मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांना दिले. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

(हेही वाचा – काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंना काहीच मिळाले नाही : Keshav Upadhye)

त्याच बरोबर या मार्गावर बांधण्यात येणारे ट्रामा हॉस्पिटलचे काम लवकर सुरु करून ते पूर्ण करावे, अशी विनंती वायकर यांनी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना यावेळी केली. तसेच डिसेंबरपर्यंत या राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले. मुंबई गोवा राज्य महामार्गावरील भोस्ते घाट येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. भोस्ते व परुशुराम घाट येथे भूस्खलन होत आहे. त्यामुळे या दोन्हीही ठिकाणी टनेल बांधण्याचे काम करण्यात यावे, अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता तयार करण्यात यावा, असे वायकर यांनी गडकरी (Nitin Gadkari) यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.