पंतप्रधान निवासात घुसण्यासाठी Congress नेत्याची चिथावणी; म्हणे श्रीलंका, बांगलादेशनंतर लागणार भारताचा नंबर

204
पंतप्रधान निवासात घुसण्यासाठी Congress नेत्याची चिथावणी; म्हणे श्रीलंका, बांगलादेशनंतर लागणार भारताचा नंबर
पंतप्रधान निवासात घुसण्यासाठी Congress नेत्याची चिथावणी; म्हणे श्रीलंका, बांगलादेशनंतर लागणार भारताचा नंबर

नरेंद्र मोदी (Narendra Modi), लक्षात ठेवा. जे लोक आज रस्त्यावर येत आहेत, ते चुकीच्या धोरणांमुळे तुमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रवेश करू शकतात आणि कब्जा करू शकतात. बांगलादेशातील गेल्या दोन दिवसांतील घडामोडी चुकीच्या धोरणांचा परिणाम आहेत. लोकांनी पंतप्रधानांच्या घरात घुसून निषेध केला आणि जर आपल्याही देशात अशीच परिस्थिती राहिली, तर इथेही होऊ शकते, अशी चेतावणी मध्यप्रदेशातील काँग्रेस (Congress) नेते आणि माजी मंत्री सज्जन सिंग वर्मा यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी खेळणार )

तणावपूर्ण परिस्थिती

भाजपवाल्यांनो अन्याय कराल, तर जनसमुदाय तुमच्याही घरात घुसेल, अशी चेतावणी त्यांनी दिली. इंदूर महानगरपालिकेतील बनावट नोटांच्या घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेसने इंदूरमध्ये निदर्शने केली. धरणे आंदोलनानंतर काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा वापर केला, परिणामी काही कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बांगलादेशमध्ये (Bangladesh) सरकार उलथवण्यासाठी आंदोलक ज्याप्रमाणे पंतप्रधान निवासात घुसले आणि त्यांनी अराजक माजवले, त्याचप्रमाणे भारतातही सत्ता उलथवू, अशी चिथावणी इंडि आघाडीचे नेते वारंवार करत आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी प्रथम याचा उच्चार केला होता. तेच लोण आता देशभर पसरले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.