Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सत्ताधारी आणि विरोधकांची नेमकी रणनीती काय आहे?

249
Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सत्ताधारी आणि विरोधकांची नेमकी रणनीती काय आहे?
Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेचं बिगुल वाजलं; जाणून घ्या सत्ताधारी आणि विरोधकांची नेमकी रणनीती काय आहे?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती (Mahayuti Sarkar) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांनी प्रचार सभांसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीनेही आता राज्यभर सभा बैठका संवाद  यात्रा सुरू करणार आहे. यासाठी महायुती २० ऑगस्टला तर महाविकास आघाडी १६ ऑगस्टला प्रचार सभांचा नारळ फोडणार आहेत.   (Maharashtra Assembly Elections 2024)

(हेही वाचा – चूक झाली, माफ करा; नाशिकच्या सभेत Ajit Pawar यांनी दिली कबुली)

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला हवा तसा जनतेचा प्रतिसाद मिळाला नव्हता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांकडे (Maharashtra Assembly Elections) महाराष्ट्रसह संपूर्ण देशाच लक्ष लागले आहे. आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी युतीची धडपड सुरू आहे. तर सत्ताधारी युतीला सत्तेवरून खेचण्यासाठी महाविकास आघाडी एकही संधी सोडत नाही. 

जाणून घेऊया सत्ताधारी आणि विरोधकांची नेमकी रणनीती काय आहे? 

सत्ताधारी महायुतीच्या प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी (०९ ऑगस्ट) रात्री उशिरा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. २० ऑगस्टला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन (Mahalakshmi Temple) घेऊन महायुती संवाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. महायुतीचे २८८ मतदार संघामध्ये ही संवाद यात्रा होणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरुवात केलेल्या संवाद यात्रेची सांगता मुंबईमध्ये होणार आहे.

एका दिवसाला दोन किंवा तीन मतदारसंघांमध्ये ही संवाद यात्रा होईल. या संवाद यात्रेचा दौरा कमीत कमी सात दिवस आणि जास्तीत जास्त दहा दिवसांचा असणार आहे. राज्याच्या सातही विभागामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहे.  (Maharashtra Assembly Elections 2024)

(हेही वाचा – महाराष्ट्रातील जनतेने उबाठाची लाचारी बघितली; Shrikant Shinde यांची घणाघाती टीका)

महाविकास आघाडीची नेमकी काय रणनिती आहे?

सध्या विरोधी बाकावर बसलेली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिली सभा मुंबईमध्ये १६ ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), नाना पटोले (Nana Patole) आणि महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २० ऑगस्टला काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार,  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीत सभा पार पडणार आहे.  

(हेही वाचा – ‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ; CM Eknath Shinde यांचे प्रतिपादन)

शरदचंद्र पवार गटाची शिवनेरीवरून शुक्रवार (९ ऑगस्ट) पासून शिवस्वराज्य यात्रेची (Shivswarajya Yatra) सुरुवात झालेली आहे. तर रविवारपासून काँग्रेस पक्षाचे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असून प्रभारी रमेश चन्नीथला हेही उपस्थित असणार आहेत.  मराठवाड्यातील जागा वाटपांच्या चाचणीसह प्रचारांच्या छोट्या-मोठ्या सभा पार पडणार आहेत. (Maharashtra Assembly Elections 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.