Nagpur News : दिव्यांग शिक्षकांना मंत्रालयातच द्यावी लागते लाच; शिक्षकांनी मांडली व्यथा

116
Nagpur News : दिव्यांग शिक्षकांना मंत्रालयातच द्यावी लागते लाच; शिक्षकांनी मांडली व्यथा
Nagpur News : दिव्यांग शिक्षकांना मंत्रालयातच द्यावी लागते लाच; शिक्षकांनी मांडली व्यथा

मोकासरे यांना मंत्रालयातील भ्रष्टाचाराचा धक्कादायक अनुभव आला आहे. त्र्यंबक मोकासरे हे स्वतः जन्मतः अंध आहेत आणि नागपूरच्या ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूट व शेल्टर वर्कशॉप फॉर द ब्लाइंड या दिव्यांग शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी तब्बल 35 वर्षे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले आहे. त्यांच्या सोबतचे सर्व शिक्षक ही दिव्यांग असून सर्वांनी अनेक दशके दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले आहे. (Nagpur News)

(हेही वाचा – आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र; Bangladesh मधील मान्यवरांनी सांगितले वास्तव)

या सर्व अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर वेतनाची थकबाकी, म्हणजेच एरियर्स देण्यासाठी मंत्रालयात 10 टक्के लाच मागितली जात आहे. सेवानिवृत्तीनंतर दिव्यांग शिक्षकांवर सातव्या वेतन आयोगाची त्यांच्याच वेतनाची थकबाकी मिळवण्यासाठी लाच देण्याची पाळी आली आहे. या दिव्यांग वृद्ध सेवानिवृत्त शिक्षकांवर मंत्रालयातून दहा टक्के लाच द्या आणि आपल्या वेतनाची थकबाकी घ्या, असा दबाव आणला जात आहे, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

अंध शिक्षकांचा निर्धार

राज्यातील शेकडो सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षकांसोबत असेच प्रकार घडत असल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूरातील ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूट व शेल्टर वर्कशॉप फॉर द ब्लाइंड शाळेतील तब्बल 40 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या लाचखोरीच्या फटका बसला आहे. या सर्व 40 सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 1 कोटी 96 लाख रुपयांची थकबाकी मंत्रालयीन पातळीवर अडकली आहे. त्यासाठी काही एजेंट दहा टक्के दराने 19 लाख रुपये लाच मागत असल्याचा आरोप आहे. काहीही झाले तरी लाच देणार नाही असा निर्धार या वृद्ध अंध शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण ?

राज्यातील मान्यता प्राप्त दिव्यांग शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2021 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला. तो पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच 2016 पासून लागू झाला. नियमाप्रमाणे दिव्यांग शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन निश्चितीही झाली आणि डिसेंबर 2021 नंतरचे वेतनही सुरळीत मिळू लागले. 2016 पासून 2021 पर्यंतच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी त्यांना एरियर्स म्हणून देण्याचे ठरले होते. ती थकबाकी सेवानिवृत्त होईपर्यंत कधीच मिळाली नाही. आता तीच थकबाकी देण्यासाठी मंत्रालयातील काही अधिकारी एजेंटमार्फत त्या साठी 10 टक्के लाच मागत असल्याचा आरोप होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यांग शिक्षकांनी केली आहे. सर्व पीडित अंध व दिव्यांग शिक्षकांनी काळे कपडे परिधान करून 15 ऑगस्टला मंत्रालयाकडे कूच करण्याचा निर्धार केला आहे. (Nagpur News)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.