बीडमध्ये Raj Thackeray यांचा ताफा उबाठा गटाने अडवला; दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने

राज ठाकरे शुक्रवारी बीड जिल्ह्यात आले असता, त्यांचं जल्लोषात स्वागत झाल, पण उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

146
बीडमध्ये Raj Thackeray यांचा ताफा उबाठा गटाने अडवला; दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने
बीडमध्ये Raj Thackeray यांचा ताफा उबाठा गटाने अडवला; दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने-सामने

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) प्रचारसभांचं बिगुल वाजलं असून येत्या काळात आता राज्यभर सभा, बैठका, संवाद यात्रा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आधारित सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) याचा मराठवाडा दौरा (MNS Marathwada tour) सुरू असून, बीड येते गेले असता उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. (Raj Thackeray)

(हेही वाचा – World Indigenous Day 2024 : मूल निवासी दिन का पाळला जातो? युरोप आणि ख्रिस्त्यांच्या अत्याचाराची विद्रुप कहाणी!)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवार (०९ ऑगस्ट रोजी) बीड जिल्ह्यात आले असता, त्यांचं जल्लोषात स्वागत झालं, पण बीड येथील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध असल्याचे सांगत त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला घेतलं. ”लोकसभेला सुपारी घेतली होती, आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन तुम्ही आला आहात? मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, त्यास तुम्ही विरोध करता. त्यामुळे, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलोय,” अशा शब्दात उबाठा गटाचे बीड जिल्हाअध्यक्ष गणेश वरेकर (UBT Ganesh Varekar) यांनी मनसे प्रमुखांचा ताफा अडवल्याचा कारण सांगितलं.  (Raj Thackeray)

तसेच, चले जाव, सुपारी बहाद्दर चले जाव, अशी आमची घोषणा असल्याचंही वरेकर यांनी म्हटलं. तसेच, एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाही यावेळी उबाठा व मराठा बांधवांनी केली.

(हेही वाचा – Nagpur News : दिव्यांग शिक्षकांना मंत्रालयातच द्यावी लागते लाच; शिक्षकांनी मांडली व्यथा)

ताफा अडवण्याचा मागचं कारण?

सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची (MNS Maratha Reservatio) गरज नाही, असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच उबाठा व मराठा बांधवांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला. (Raj Thackeray)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.