आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी ‘येत्या १० ते १५ वर्षांत आसाम, बंगाल आणि झारखंड या राज्यांची स्थितीही बांगलादेशासारखी होऊ शकते असे म्हटले आहे. आसाम (Assam), बंगाल (Bengal) आणि झारखंड (Jharkhand) येथील हिंदु समुदायाला त्यांच्या भविष्याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. पुढील १०-१५ वर्षांत तेथे अशी परिस्थिती उद्भवू नये, अशी माझी इच्छा आहे’, असे उद्गार काढले. सरमा यांनी फेसबुक लाईव्हद्वारे त्यांचे विचार मांडले. (Assam CM On Bangladesh Protests)
(हेही वाचा – World Indigenous Day 2024 : मूल निवासी दिन का पाळला जातो? युरोप आणि ख्रिस्त्यांच्या अत्याचाराची विद्रुप कहाणी!)
मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा पुढे म्हणाले की, बांगलादेशातील इस्कॉन मंदिर आणि श्री दुर्गा मंदिर पाडल्याचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. बांगलादेशमध्ये एका हिंदूची हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला लटकवल्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. बांगलादेशातील घटना मला पुनःपुन्हा आठवण करून देत आहे की, आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य झाले आहेत.
आम्ही सीमा सुरक्षित ठेवू. आम्ही कोणालाही सीमा ओलांडू देणार नाही. कारण ही एक घटनात्मक जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी पार पाडू. वर्ष २००१ ते २०१४ पर्यंत आसाम पोलिसांमध्ये सुमारे ३० ते ३५ टक्के भरती एका विशिष्ट समुदायातील (मुसलमानांची) लोकांची करण्यात आली होती. आज आसाम सरकार पोलीस आणि वनरक्षक दल यांमध्ये प्रत्येक धर्मातील लोकांची भरती करत आहे, असेही सरमा यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनू नये!
तत्पूर्वी, बुधवारी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आणि शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनू शकतो, असे प्रतिपादन केले होते. बांगलादेशातील अशांततेमुळे मोठ्या संख्येने लोक भारतात येऊ शकतात, त्यामुळे भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. देशाला अतिरेकी कारवायांचे केंद्र बनण्यापासून रोखण्यासाठी भारत सरकार बांगलादेश सरकारशी जवळचे संबंध कायम ठेवेल, अशी आशा सरमा यांनी व्यक्त केली आहे. (Assam CM On Bangladesh Protests)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community