Bandra Fort : वांद्रे किल्ला निघणार झगमगून

134
Bandra Fort : वांद्रे किल्ला निघणार झगमगून

मुंबई महापालिकेच्यावतीने मागील चार वर्षांपासून चर्चेत असलेल्या वांद्रे किल्ल्यावर (Bandra Fort) अखेर विद्युत रोषणाई केली जाणार असून या रोषणाईद्वारे या किल्ल्याचे सौंदर्यीकरण केले जणार आहे. मात्र, या विद्युत रोषणाईसह केल्या जाणाऱ्या सौंदर्यीकरणासाठी विविध करांसह ६ कोटी ३० लाख रुपये खर्च केला जाणार आहे. याठिकाणी विद्युत रोषणाई केल्यानंतर पाच वर्ष त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची राहणार आहे. पुढील पाच वर्षांच्या देखभाल केली जाणार असल्याने रोषणाई केल्यानंतर हा किल्ला आता आकर्षक रोषणाईने मुंबईकरांसह पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे.

(हेही वाचा – Raj Thackeray Marathwada Visit : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु; मनसेची उबाठाला चेतावणी)

वांद्रे पश्चिम येथील बी. जे. दक्षिणेकडील टोकाला सुमारे ४०० वर्षे जुना किल्ला असून हा किल्ला १६४० मध्ये पोर्तुगीजांकडून माहिमच्या खाडीव निरिक्षण मनोरो म्हणून बांधण्यात आला होता. या किल्ल्याची देखभाल ही राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याकडून केले जाते. वांद्रे किल्ल्याच्या (Bandra Fort)  दक्षिण आणि पश्चिम बाजूस समुद्र असून वांद्रे वरळी सागरी मार्गावरून मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात प्रवेश करताना हा किल्ला दृष्टीस पडत असून या विद्युत रोषणाईमुळे पर्यटकांना हा किल्ला प्रवास करताना न्याहाळता येणार आहे.

(हेही वाचा – AAP : केजरीवाल यांच्या पक्षाने दिले उद्धव ठाकरेंना टेंशन)

या किल्ल्याच्या (Bandra Fort) जवळील समुद्रावर लेझर किरणांची रोषणाईचे विविध पर्याय आणि किल्ल्याच्या जवळील समुद्रावर वांद्रे किल्ल्याची रोषणाई आदी प्रकारची कामे केली जाणार आहे. या कामांसाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये फ्लुईड अँड पावर ऑटोमेशन्स एलएलपी ही कंपनी पात्र ठरली असून विद्युत रोषणाईसह पाच वर्षांच्या देखभालीकरता ६.३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या विद्युत रोषणाईच्या कामात शशांक मेहेंद्रळे यांची सल्लागार सेवा घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या किल्ल्यावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.