Paris Olympics 2024 : विनेश फोगाटची याचिका लवादाकडून स्वीकृत, ऑलिम्पिक स्पर्धा संपण्यापूर्वी निर्णय

157
Paris Olympics 2024 : विनेश फोगाटची याचिका लवादाकडून स्वीकृत, ऑलिम्पिक स्पर्धा संपण्यापूर्वी निर्णय

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणी दाखल करण्यात आलेली अपिल याचिका आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून स्वीकारण्यात आली आहे. या संदर्भात क्रीडा लवाद न्यायालयाकडून (सीएएस-कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) शुक्रवारी निवेदन जारी करण्यात आले आहे. सदर लवादासमोर भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे हे युक्तिवाद करणार आहेत.

सीएएसने निवेदनात म्हटले आहे, विनेश आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (यूडब्ल्यूडब्ल्यू) या दोघांच्या सुनावणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रकरण डॉ ॲनाबेले बेनेट एसी एससी (AUS) यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. या दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून ऑलिम्पिक स्पर्धा (Paris Olympics 2024) संपण्यापूर्वी निर्णय दिला जाणार आहे.

(हेही वाचा – Red Run Marathon : एचआयव्ही एड्स जनजागृतीसाठी ‘रेड रन मॅरेथॉन’ स्पर्धा)

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट कुस्तीच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरली होती, परंतु अंतिम सामन्यापूर्वीच तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले, त्यानंतर तिला स्पर्धेसाठी अपात्र घोषित करण्यात आले. या निर्णयाविरोधात तिने याचिका दाखल केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने तिचे अपील स्वीकारले असल्याने तिला रौप्य पदक मिळवण्याच्या आशा वाढल्या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने सीईएसटीवरील सीएएस आणि हॉक विभागात अर्ज दाखल केला होता. या अर्जात तिने ऑलिम्पिक स्पर्धेतील महिलांच्या फ्रीस्टाइल ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी तिच्याविरुद्ध घेतलेल्या निर्णयावर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. वजन कमी करण्यात अयशस्वी झाल्यामुळे विनेश फोगटला युनायटेड वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपकडून अपात्र घोषित करण्यात आले. विनेशने या निर्णयाला आव्हान देत हा निर्णय रद्द करावा आणि अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन पुन्हा मोजावे, जेणेकरून ती अंतिम सामन्यासाठी आपली पात्रता सिद्ध करू शकेल, अशी मागणीही केली होती. सीएएस आणि हॉक विभागाची प्रक्रिया वेगवान आहे, परंतु तासाभरात या याचिकेवर निर्णय देणे शक्य नव्हते. या प्रकरणी यूडब्ल्यूडब्ल्यूचेही म्हणणे ऐकावे लागणार आहे. या प्रकरणाची प्रक्रिया सुरू आहे. (Paris Olympics 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.