Airoli Crime: ऐरोलीच्या खाडीत तिवरांमध्ये काढले ७८ तास, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पित्यानेच वाचवले

249
Airoli Crime: ऐरोलीच्या खाडीत तिवरांमध्ये काढले ७८ तास, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पित्यानेच वाचवले
Airoli Crime: ऐरोलीच्या खाडीत तिवरांमध्ये काढले ७८ तास, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पित्यानेच वाचवले
एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेल्या जिम ट्रेनर तरुणाने बदनामीच्या भीतीने आत्महत्या करण्यासाठी ऐरोलीच्या (Airoli Crime) खाडीत उडी घेतली होती, तब्बल ७८ तासांच्या शोध मोहिमेनंतर हा तरुण खाडीत असलेल्या तिवरांच्या झुडुपात गुरुवारी सुखरूप आढळून आला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुलगा सुखरूप मिळून आल्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. (Airoli Crime)
मुलुंड पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत (१८ जुलै) रोजी फिटनेस इंटेलिजन्स या जिम मध्ये जिम ट्रेनर असणारा धरव नाकेर याने  क्षुल्लक वादातून योगेश शिंदे (Yogesh Shinde) या तरुणाच्या डोक्यात लाकडी मुदगलने प्रहार केला होता, या हल्ल्यात युगेश हा जखमी झाला होता. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या हल्ल्याप्रकरणी नवघर पोलिसानी धरव नाकेर या जिम ट्रेनर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. दोन दिवसांनी धरव नाकेर हा जामिनावर बाहेर पडला,परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे तसेच अटकेमुळे झालेल्या बदनामीच्या भीतीने धरव नाकेर याने आयुष्य संपविण्याचे ठरवले. (Airoli Crime)
सोमवारी सायंकाळी धरव हा जिम मध्ये जातो म्हणून घरातून बाहेर पडला, त्यानंतर तो घरी परतला नाही, चिंतेत असलेल्या कुटूंबियांनी मंगळवारी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.नवघर पोलिसांनी मंगळवारी धवर चा शोध घेतला असता त्याची मोटारसायकल ऐरोली खाडीच्या पुलावर आढळून आली.धवरने ऐरोली पुलावरून खाडीत उडी टाकून आत्महत्या केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमार यांच्या मदतीने धवरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु धवर आढळून आला नाही. मंगळवारी रात्री ही शोध मोहिम थांबविण्यात आली.  (Airoli Crime)
मुलाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या नाकेर कुटुंबीयांनी सतत दोन दिवस पोलिसांना धवरचा शोध घेण्याची विनंती केली, अखेर धवरचे वडील यांनी स्वतः मुलाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांकडून एक नाव (बोट) उपलब्ध करून देण्याची विनंती केली.गुरुवारी सकाळी धवरचा शोध घेण्यात आल्यानंतर खाडी पुलापासून काही अंतरावर तिवरांच्या झाडात कसला तरी आवाज आल्याने मच्छिमार यांनी त्या ठिकाणी बोट आणून आवाजाचा कानोसा घेतला असता त्यांना एकापुरुषाचा हेल्प हेल्प असा आवाज आला, त्यांनी जवळ जाऊन बघितले असता धवर हा तिवरांच्या झाडात आढळून आला. धवरला तात्काळ बोटीत टाकून किनाऱ्यावर आणण्यात आले, आ इ त्याला उपचारासाठी नजीकच्या रुगणाल्यात दाखल करण्यात आले. धवर भेटल्याची माहिती नवघर पोलिसांना देण्यात आली. (Airoli Crime)
धवर हा सुखरूप मिळून आल्याने नाकेर कुटूंबियाच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. नाकेर कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहताना दिसून येत होते. तर दुसरीकडे धवर याने या तिवरांच्या जंगलात ७८ तास कसे काढले, त्यातून तो बचावला कसा1 असा प्रश्न पोलीसासह अनेकांना पडला आहे. धवर याच्यावर नजीकच्या रुग्णलयात उपचार सुरू आहे, लवकरच धवरचा जबाब नोंदविण्यात येणार असून धवर हा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर कसा आला याचा उलगडा होईल असे एका अधिकारी यांनी सांगितले. (Airoli Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.