Kolhapur : ‘केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिल’, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

157
Kolhapur : 'केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिल', मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही
Kolhapur : 'केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिल', मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही

कोल्हापुरातील (Kolhapur) ऐतिहासीक केशवराव भोसले नाट्यगृह (keshavrao bhosale natyagruha)आगीत जळून खाक झालं. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. तब्बल अडिच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेवर दुःख व्यक्त करतानाच ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

(हेही वाचा –दादर रेल्वे स्टेशन पुन्हा हादरलं! Nandigram Express च्या शौचालयात सापडला गळफास लावलेला मृतदेह)

कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आगीची घटना अत्यंत वेदनादायी, दुर्दैवी असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आवश्यक खर्चाची तरतूद सरकारकडून केली जाईल. तर, या घटनेची संपूर्णपणे चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Kolhapur)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग अत्यंत वेदनादायी आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे राज्यातील कलाप्रेमी दुःखी झाले आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू अनेक दर्जेदार कलाकृती आणि कलाकारांच्या सादरीकरणाची साक्षीदार होती. केशवराव भोसले यांची आज जयंती असून पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडणे वेदनादायी आहे. ही वास्तू पुन्हा एकदा दिमाखात उभी राहील आणि येथे कलाकृती सादर होत राहतील.” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. (Kolhapur)

(हेही वाचा –CM Eknath Shinde: मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश )

“कोल्हापूरला कलेचा वारसा आहे. अनेक कलाकार इथं घडले, त्यांच्या आठवणी वास्तूशी जोडलेल्या होत्या. त्यामुळेच ही वास्तू आगीत भस्मसात होणे, ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक हानी आहे. येथील कलेच्या वास्तू, कलाकार आणि कला या साऱ्याची जपणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे.” असे मुख्यमंत्री म्हणाले. (Kolhapur)

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.