Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी रितिका हूडावर सगळ्यांची नजर 

105
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी रितिका हूडावर सगळ्यांची नजर 
Paris Olympic 2024 : ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी रितिका हूडावर सगळ्यांची नजर 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) आतापर्यंत भारतीय संघाने १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई केली आहे. दुहेरी आकड्याची अपेक्षा असताना निदान टोकयोतील कामगिरीच्या जवळ जाऊ शकलो, इतकं समाधान तरी भारतीय पथकाला आता असेल. ऑलिम्पिक स्पर्धा समारोपाला आता अवघे दोन दिवस बाकी आहेत. भारताचं आव्हानही दोन प्रकारातच उरलं आहे. कुस्ती आणि गोल्फमध्ये भारताचे तीन खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

(हेही वाचा- BMC : मुंबईतील जाहिरातींचे प्रारूप धोरण प्रसिद्ध, जनतेकडून जाणून घेणार हरकती – सूचना)

महिलांच्या ७६ किलो वजनी गटात रितिका हूडा आपली ऑलिम्पिक मोहीम शनिवारी सुरू करणार आहे. तर दिक्षा डागर आणि अदिती अशोक या गोल्फ स्ट्रोक प्लेच्या वैयक्तिक प्रकारात चौथी आणि शेवटची फेरी खेळत आहेत. भारतीय पथकाचं १० ऑगस्टचं वेळापत्रक पाहूया, (Paris Olympic 2024)

गोल्फ 

१२.३० – अदिती अशोक व दिक्षा डागर, महिलांचा स्ट्रोक प्ले चौथी फेरी (दोघीही सध्या क्रमवारीत ४० च्या पुढे)

(हेही वाचा- Kolhapur : ‘केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिल’, मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही)

कुस्ती 

२.५१ – दुपारी रितिका हूडाचा ७६ किलो वजनी गटात अंतिम १६ जणींमधील सामना

४.२० – रितीका हूडा उपउपांत्य फेरीचा सामना (पात्र ठरल्यास)

१०.२५ – रितिका हूडा उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.