Bandra Hill Road : वांद्रे स्टेशनपासून सलमान खानच्या घरापर्यंतचा प्रवास आता सुसाट

2520
Bandra Hill Road : वांद्र्याच्या हिल रोडने घेतला मोकळा श्वास, आता या मार्गांवरील प्रवास सुसाट
Bandra Hill Road : वांद्र्याच्या हिल रोडने घेतला मोकळा श्वास, आता या मार्गांवरील प्रवास सुसाट
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
वांद्रे पश्चिम येथे हिल रोडने (Bandra Hill Road) आता खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला आहे. हा रस्ता मुळात २७ मीटर रुंदीचा आहे. पण या रस्त्याच्या सुरुवातीच्या भागातच अतिक्रमण असल्याने याठिकाणी मोठा बॉटलनेक तयार झाला होता, परिणामी या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे मागील चार ते पाच वर्षांपासून हे अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रयत्न एच – पश्चिम विभागाच्या वतीने सुरू होता. अखेर त्याला यश मिळाले असून येथील १२ दुकाने व कमर्शियल गाळे आणि २ निवासी घरातील कुटुंबाचे पर्यायी जागेत पुनर्वसन केल्यानंतर ही बांधकामे शुकवारी  तोडण्यात आली. त्यामुळे हा मार्ग आता सलग २७ फूट रुंदीचा झाला असून यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायम स्वरुपी सुटला गेला आहे. परिणामी या मार्गांवरील प्रवास सुसाट होणार आहे. (Bandra Hill Road)
वांद्रे पश्चिम येथील हिल रोडची (Bandra Hill Road) रुंदी २७ मीटर रुंद असून हा मार्ग लकी हॉटेल पासून ते सलमान खान रहात असलेल्या गॅलेक्सी अर्पाटमेंटपर्यंत जातो. या मार्गाची रुंदी २७ मीटर  रुंद असली तरी काही ठिकाणी याची १५० रुंदीचा भाग हा अतिक्रमित होता. याठिकाणी १२ दुकाने तथा कमर्शिअल गाळे होते. तर दोन निवासी घरांचा समावेश होता आणि ही बांधकामे १९६२ ची होती. त्यामूळे रस्ता रुंदीकरणात ही बांधकामे हटवणे आवश्यक होते आणि ही बांधकामे हटवल्याशिवाय या रस्त्याचे रुंदीकरण करणे शक्य नव्हते. म्हणून महापालिका एच पश्चिम विभागाच्या वतीने या बांधकामांना सन २०२०-२१ मध्ये नोटीस बजावली  होती. या विरोधात गाळे धारक न्यायालयात गेले होते. पण तिथे न्यायालयात निकाल त्यांच्या विरोधात गेल्याने महापालिकेच्या नियमानुसार पात्र व्यक्तीला पर्यायी गाळे उपलब्ध करून देत ही जागा त्यांना सोडायला लावली. त्यानुसार ही जागा रिकामी केल्यानंतर शुकावारी एच पश्चिम विभागाच्या वतीने येथील तोडक कारवाई करून हे अतिक्रमण हटवत मागील अनेक वर्षांपासून वांद्र्यातील जनतेने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार केले.  (Bandra Hill Road)
Untitled design 2024 08 10T100409.533
Untitled design 2024 08 10T100432.291
महापालिकेचे परिमंडळ ३ चे उपायुक्त विश्वास मोटे (Vishvas mote) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते (Vinayak Vispute) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.येथील १२ कमर्शियल गाळे धारकांना त्याच परिसरात पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे, तर दोन निवासी कुटुंबाला कांदिवली येथे घरे उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांनी या जागेचा ताबा सोडल्यानंतर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. सकाळी ८ वाजता हाती घेतलेली ही कारवाई रात्री पूर्ण करण्यात आली. या कारवाईत  ५ जेसीबी, ५डंपर  तसेच ५० मजूर कामगार अनेक १५ कर्मचारी आदींचा समावेश होता. (Bandra Hill Road)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.