Paris Olympic 2024 : अल्जेरियाची वादग्रस्त मुष्टियोद्धा इमान खलिफला सुवर्ण 

Paris Olympic 2024 : प्रतिस्पर्ध्याने सामना अर्धवट सोडल्यामुळे इमान चर्चेत आली होती 

140
Paris Olympic 2024 : अल्जेरियाची वादग्रस्त मुष्टियोद्धा इमान खलिफला सुवर्ण 
Paris Olympic 2024 : अल्जेरियाची वादग्रस्त मुष्टियोद्धा इमान खलिफला सुवर्ण 
  • ऋजुता लुकतुके

ती महिला आहे की पुरुष यावरून वाद निर्माण झालेली अल्जेरियाची (Algeria) मुष्टियोद्धा इमान खलिफने (Iman Khalif) महिलांच्या ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं आहे. चीनच्या यांग लिऊचा (Yang Liu) पराभव करत तिने विजेतेपद पटकावलं. पाचही पंचांनी तिच्या बाजूनै कौल दिला. या सुवर्ण पदकानंतर आपलं ८ वर्षांचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना तिने व्यक्त केली आहे. अल्जेरियाने या ऑलिम्पिकमध्ये पटकावलेलं हे दुसरं सुवर्ण आहे. त्यामुळे तिच्या सहकाऱ्यांनी तिला खांद्यावर उचलून घेत तिचं अभिनंदन केलं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Vijay Surya Mandir : मध्‍यप्रदेशातील प्राचीन सूर्यमंदिराला पुरातत्‍व विभागाने ठरवले मशीद; हिंदूंनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मागणी)

खलिफचा हा विजय आणि एकूणच अंतिम सामना ती महिला आहे की पुरुष या वादामुळे चर्चेत आला होता. स्वत: इमान आणि तिची चिनी प्रतिस्पर्धी लिन यु (Yang Liu) या दोघीही गेल्यावर्षी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत लिंगविषयक वादामुळेच अपात्र ठरल्या होत्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोघींना ऑलिम्पिकमध्ये खेळायला परवानगी दिली होती. पण, इमानच्या प्रतिस्पर्धीने तिच्याविरुद्धचा सामना अर्धवट सोडला आणि हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. (Paris Olympic 2024)

इमान खलिफ (Iman Khalif) ५ फूट ९ इंचांची आहे. भारदार शरीरयष्टी तसंच ताकदीचा वापर करत तिने प्रतिस्पर्ध्यांवर चांगलंच वर्चस्व या स्पर्धेत गाजवलं आहे. तिच्या लिंगावरून वाद निर्माण झाल्यावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी तिचं समर्थन केलं होतं. ‘इमान ही मुलगी म्हणून जन्माला आली आहे. मुलगी म्हणूनच वाढली आहे. ते सिद्ध करणारे पुरावे कागदपत्रांच्या रुपात तिने सादर केले आहेत,’ असं बाख म्हणाले होते. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Airoli Crime: ऐरोलीच्या खाडीत तिवरांमध्ये काढले ७८ तास, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पित्यानेच वाचवले)

इमानने या ऑलिम्पिकमध्ये अडचणींवर मात करण्याची आपली वृत्ती दाखवून दिली आहे. तिने अंतिम सामना जिंकल्यावर जमलेल्या १५,००० प्रेक्षकांनीही तिच्या बाजूने जल्लोष केला. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.