Bangladesh protests: बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत भारत सरकार सतर्क; सीमेवर नेमकं काय घडतयं?

143
Bangladesh protests: बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत भारत सरकार सतर्क; सीमेवर नेमकं काय घडतयं?
Bangladesh protests: बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत भारत सरकार सतर्क; सीमेवर नेमकं काय घडतयं?

बांगलादेशात (Bangladesh protests) हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरू आहे. देशात अशांतता असताना आंदोलक हिंदूंनाही लक्ष्य करत आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सीमेवर मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत. बांगलादेशात सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनादरम्यान गेल्या काही दिवसांपासून तेथे राहणाऱ्या समुदायांवर हिंसाचार होत आहे. मोहम्मद युनूस यांनी गुरुवारी बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. देशातील परिस्थिती लवकरच सामान्य होईल आणि हिंदूंसह इतर अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.

बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत केंद्र सरकारच एक मोठं पाऊल
बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत भारत सरकार सतर्क आहे. आता केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून दिली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडचे एडीजी यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. यापूर्वी बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दक्षता वाढवली आहे. बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांमुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. (Bangladesh protests)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले की, बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील (IBB) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. भारतीय नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल. या समितीचे अध्यक्ष सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडचे एडीजी असतील. (Bangladesh protests)

सीमेवर नेमकं काय घडलं?
शेकडो बांगलादेशी नागरिकांनी शुक्रवारी सकाळी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने हाणून पाडला. ही घटना पश्चिम बंगालमधील कुचबिहार जिल्ह्यात घडली. त्यामुळे या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीमेवर उभारलेले कुंपण ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू होता. कुचबिहार जिल्ह्याला लागून असलेल्या बांगलादेशमधील लालमोनिरहाट जिल्ह्यातील गेंदुगुरी, डोईखावा या गावांमधील हे नागरिक होते. त्यातील बहुतांश हिंदू होते, अशी माहिती आहे. (Bangladesh protests)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.