Aman Sehrawat Bronze : अमनवर सोशल मीडियात अभिनंदनचा वर्षाव

Aman Sehrawat Bronze : २१व्या वर्षी ऑलिम्पिक पदक जिंकून अमन सेहरावतने रचला इतिहास 

141
Aman Sehrawat : ऑलिम्पिक कांस्य विजेत्या अमन सेहरावतचं जोरदार स्वागत
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या अमन सेहरावतने (Aman Sehrawat Bronze) ५७ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. २१ व्या वर्षी ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो भारताचा वयाने सगळ्यात लहान कुस्तीपटू ठरला आहे. शिवाय दोनच दिवसांपूर्वी विनेश फोगाट अंतिम फेरीत पोहोचूनही पदकापासून वंचित राहिली, त्या गोष्टीमुळे भारतीय गोटात आलेली मरगळही अमनच्या पदकामुळे दूर झाली. या ऑलिम्पिकमधील भारताचं हे सहावं पदक ठरलं आहे.

(हेही वाचा- Bandra Hill Road : वांद्रे स्टेशनपासून सलमान खानच्या घरापर्यंतचा प्रवास आता सुसाट)

कांस्य पदकाच्या लढतीत प्रतिस्पर्धी डॅरियन विरुद्ध अमनने पहिला गुण गमावला होता. पण, उमेद न हरता त्याने नवीन डावपेच लढवायला सुरुवात केली. म्हणता म्हणता सामन्यात आघाडी घेतली. प्रत्येकी ५ गुणांवर दोघे होते. पण, त्यानंतर सामन्याचा अख्खा तोल अमनच्या बाजूने झुकला. त्याने १३ विरुद्ध ५ गुणांनी हा सामना खिशात घातला. (Aman Sehrawat Bronze)

विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विटरवर खास संदेश लिहून अमनचं अभिनंदन केलं. ‘अडचणींवर मात करून तू मिळवलेला विजय अभिमानास्पद आहे,’ असं पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. त्याचबरोबर इतरांनीही अमनवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अमनचे आई-वडील तो लहान असतानाच वारले. त्यानंतर त्याच्या आजोबांनी गरिबीत त्याचा सांभाळ केला आहे. (Aman Sehrawat Bronze)

(हेही वाचा- Bangladesh protests: बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत भारत सरकार सतर्क; सीमेवर नेमकं काय घडतयं?)

ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक क्रीडाप्रकारात भारताने सर्वाधिक पदकं कुस्तीत जिंकली आहेत. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं. त्यानंतर सुशील कुमार (Sushil Kumar), योगेश्वर दत्त (Yogeshwar Dutt), साक्षी मलिक (Sakshi Malik), रवी दाहिया (Ravi Dahiya) आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी कुस्तीत ऑलिम्पिक पदकाची कमाई केली आहे. या पंक्तीत आता अमन सेहरावत सामील झाला आहे. (Aman Sehrawat Bronze)

यंदा ६ कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. त्यातील अंशू आणि अंतिमचं आव्हान पहिल्या फेरीतच संपलं. तर निशा दाहियाला उपउपान्त्य फेरीत दुखापतीमुळे हार पत्करावी लागली. विनेश फोगाट अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही वजन जास्त भरल्यामुळे अपात्र ठरली. आता रितिका हूडा हे एकमेव आव्हान शिल्लक आहे. (Aman Sehrawat Bronze)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.