Raj Thackeray Visit : मनसेच्या इशाऱ्याला उबाठा गट घाबरला; आंदोलन करून ‘हात’ झटकले

179
Raj Thackeray Visit : मनसेच्या इशाऱ्याला उबाठा गट घाबरला; आंदोलन करून ‘हात’ झटकले
Raj Thackeray Visit : मनसेच्या इशाऱ्याला उबाठा गट घाबरला; आंदोलन करून ‘हात’ झटकले

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उबाठाला (UBT) दम दिल्यानंतर उबाठा पक्षाने घाबरून आपली भूमिका बदलली आणि बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपऱ्या फेकणारे उबाठाचे कार्यकर्ते नव्हते असे जाहीर केले. तसेच या आंदोलनाशी उबाठाचा काही संबंध नाही, असेही उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी सकाळच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (Raj Thackeray Visit)

संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी ‘उबाठा.. सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार’, असा इशारा उबाठाला दिला होता.

(हेही वाचा- Bangladesh protests: बांगलादेशच्या सद्यस्थितीबाबत भारत सरकार सतर्क; सीमेवर नेमकं काय घडतयं?)

बाणेदार बाळासाहेब ठाकरे

१९९२ ला बाबरी मशीद करसेवकांकडून पाडली गेली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना ‘बाबरी पाडणारे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे,’ असे बाणेदार उत्तर दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भूमिकेशी कशी प्रतारणा केली नाही किंवा पळ काढला नाही. आता मात्र त्यांची पूत्र उद्धव ठाकरे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत आणि वेळोवेळी पक्ष आपली भूमिका बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. (Raj Thackeray Visit)

सुपऱ्या फेकून निषेध 

संजय राऊत तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांचा मनसे पक्षावर सुपरीबाज असा आरोप नेहमी केला जातो. शुक्रवारी ९ ऑगस्ट २०२४ ला बीड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या ताफ्यावर शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी सुपऱ्या फेकून निषेध व्यक्त केला. त्यांनंतर मनसे आणि उबाठा कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. (Raj Thackeray Visit)

(हेही वाचा- Bandra Hill Road : वांद्रे स्टेशनपासून सलमान खानच्या घरापर्यंतचा प्रवास आता सुसाट)

आंदोलन करणाऱ्यांमध्ये मनसेचे मराठा

शनिवारी १० ऑगस्टला सकाळी-सकाळी उबाठा प्रवक्ते राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सुपारी फेकणारे उबाठाचे कार्यकर्ते नव्हते असा खुलासा केला. हे सांगताना राऊत म्हणाले की आंदोलन करणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय मराठा आणि त्यात मनसेचे कार्यकर्तेदेखील होते. या आंदोलनाचा उबाठाशी कसलाही संबंध नाही, असे सांगून राऊत यांनी हात झटकले. यामुळे मनसेच्या (MNS) आक्रमक पवित्र्यानंतर उबाठामध्ये घबराट पसरली आणि आंदोलनाशी आपला काही संबंध नाही, अशी भूमिका घेतली. (Raj Thackeray Visit)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.