Paris Olympic 2024 : अंतिम पनघल भारतात परतली, निर्दोष असल्याचा केला दावा 

Paris Olympic 2024 : शिस्तभंगाच्या कारवाईवरून अंतिमला भारतात पाठवून देण्यात आलं होतं 

162
Paris Olympic 2024 : अंतिम पनघल भारतात परतली, निर्दोष असल्याचा केला दावा 
Paris Olympic 2024 : अंतिम पनघल भारतात परतली, निर्दोष असल्याचा केला दावा 
  • ऋजुता लुकतुके

कुस्तीपटू अंतिम पनघल (Antim panghal) शुक्रवारी रात्री आपल्या पथकासह नवी दिल्लीला परतली. शिस्तभंगाच्या कारवाईवरून ती चर्चेत आली होती. आपल्या बहिणीला ओळखपत्र देऊन ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये तिला घुसवण्याचा प्रयत्न केला असा आरोप तिच्यावर होता. त्यासाठी स्थानिक पॅरिस पोलिसांनी काही काळ तिला ताब्यातही घेतलं होतं. अखेर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मध्ये पडून तिला या प्रकरणातून सोडवलं. तिच्या सपोर्ट स्टाफसह तिला तातडीने भारतात पाठवून देण्यात आलं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Sajeeb Wazed Joy : शेख हसीनांच्या मुलाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाले…)

नवी दिल्लीत परतल्यावर आपण कोणतीही चूक केलेली नाही, असा दावा अंतिमने केला आहे. पण, पॅरिसमध्ये घडलेल्या प्रसंगाची चौकशी होणार हे जवळ जवळ निश्चित आहे. (Paris Olympic 2024)

अंतिमने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं आहे. पण, ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत तिचा पराभव झाला. त्यानंतर तिचा सपोर्ट स्टाफ राहत असलेल्या हॉटेलमध्ये ती गेली. तिथून तिने आपली बहीण निशाला ओळखपत्र ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पाठवलं. निशा अंतिमचं सामान तिच्या खोलीतून आणणार होती. पण, चुकीच्या ओळखपत्रावर व्हिलेजमध्ये ती पकडली गेली. हा गंभीर गुन्हा असल्यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांनी निशाला ताब्यात घेतलं. नंतर अंतिमलाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं. शेवटी शेफ द मिशन गगन (Chef The Mission Gagan) नारंग यांनी हे प्रकरण सोडवलं.

(हेही वाचा- Raj Thackeray Visit :  ‘मराठा विरुद्ध मनसे’ वाद लावण्याचे उबाठाचे षडयंत्र)

‘आपली तब्येत बरी नव्हती. म्हणून बहीण निशाला पाठवलं. तिथे तिला आपली बाजू सुरक्षा अधिकाऱ्यांना नीट सांगता आली नाही. म्हणून गैरसमजातून हा गोंधळ झाला,’ असं अंतिमने पीटीआयशी बोलताना सांगितलं.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.