बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद जॉय (Sajeeb Wazed Joy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत. आईचे प्राण वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी केलेल्या तत्पर कारवाईबद्दल भारत सरकारला माझा संदेश ही वैयक्तिक कृतज्ञता आहे. असं ते म्हणाले आहेत. पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन बांगलादेशातून पलायन केलेल्या शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला होता. यासंदर्भात त्यांनी व्हिडिओ पोस्ट करून भारताविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
#WATCH | Washington, DC: Former Bangladesh PM Sheikh Hasina’s son, Sajeeb Wazed Joy says, “My message to the government of India, is my personal gratitude to Prime Minister Modi for his government’s quick action in saving my mother’s life. I am eternally grateful. My second… pic.twitter.com/luXYynELey
— ANI (@ANI) August 9, 2024
(हेही वाचा –भारत ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास सुरू करणार; राष्ट्रपती Draupadi Murmu यांची माहिती)
“शेख हसीना यांच्या सरकारने बांगलादेशात शांतता राखली, आर्थिक वाढ रोखली, बंडखोरी थांबवली आणि आपल्या उपखंडाचा पूर्व भाग स्थीर ठेवला. हे कोणीही नाकारू शकत नाही. याचे ट्रॅक रेकॉर्डही आहेत. आमचं एकमेव सरकार आहे, ज्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. इतर सरकारांनी अनेक प्रयत्न केले. परंतु ते अयशस्वी झाले.” असं शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय (Sajeeb Wazed Joy) म्हणाले.
(हेही वाचा –भारत ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास सुरू करणार; राष्ट्रपती Draupadi Murmu यांची माहिती)
“भारत सरकारला माझा संदेश आहे, माझ्या आईचे प्राण वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने त्वरित कारवाई केल्याबद्दल मी त्यांचे वैयक्तिक आभार मानतो. मी सदैव कृतज्ञ राहीन. माझा दुसरा संदेश असा आहे की भारताने जगात नेतृत्वाची भूमिका घेणे आवश्यक आहे आणि इतर परकीय शक्तींना परिस्थितीवर हुकूम करू देऊ नये. कारण हा भारताचा शेजारी आहे. ही भारताची पूर्व बाजू आहे.” असंही सजीब वाझेद (Sajeeb Wazed Joy) म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community