- ऋजुता लुकतुके
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा (Vinod Kambli) चालताना तोल जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आल्यामुळे त्याची तब्येत बरी नसल्याची चर्चा अलीकडे सुरू होती. पण, आता विनोदचा शाळकरी मित्रांबरोबरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तब्येत अगदी ठणठणीत असल्याचं तो स्वत: सांगताना दिसतो. क्रिकेट एकत्र खेळलेले दोन मित्र मार्कस आणि रिकी यांच्याबरोबर विनोदने काही वेळ घालवला आणि दोघांबरोबरचा संवाद आता व्हायरल झाला आहे.
After facing some health issues, former Indian cricketer, #Vinodkambli is fit and fine, and doing well. His school mate, Ricky Couto and First Class Umpire, Marcus Couto spent 5 hrs with him yesterday during which he was in good spirits and spoke to several other friends as well. pic.twitter.com/e79LpBKRoc
— Rameshwar Singh (@RSingh6969a) August 9, 2024
(हेही वाचा – Raj Thackeray Visit : ‘मराठा विरुद्ध मनसे’ वाद लावण्याचे उबाठाचे षडयंत्र)
विनोदाने केला शिवाजी पार्कचा उल्लेख
नव्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी (Vinod Kambli) त्याच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे. यामध्ये विनोद कांबळी म्हणाला की, मी बरा आहे. मॉर्कस मी ठीक आहे. देवाच्या कृपेने मी ठीक आहे. पुढे त्याच्या मित्राने फलंदाजी करण्यासाठी तयार आहे का? असं विचारल्यानंतर मी तयार असल्याचं विनोद कांबळी म्हणालाय. यावेळी बोलताना त्याने फिरकीपटूंना इशारा दिला आहे. त्यांनी मैदानाच्या बाहेर उभं राहावं, असंही तो विनोदाने म्हणत आहे. या सर्वात तो शिवाजी पार्कचा उल्लेख करण्यास विसरलेला नाही.
विनोद कांबळीचं वय ५२ वर्ष असून त्याची ही स्थिती पाहून क्रिकेट चाहत्यांना देखील वेदना झाल्या होत्या. अखेर काही क्रिकेट चाहत्यांनी सचिन तेंडुलकरकडे मदतीची मागणी केली होती. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी लहानपणी मित्र होते. विनोद कांबळी (Vinod Kambli) आणि सचिन तेंडुलकर या दोघांना रमाकांत आचरेकर यांनी मार्गदर्शन केलं होतं. विनोद कांबळी ह्रदयविकारासह डिप्रेशनचा देखील सामना करत आहे. त्यामुळं अनेकदा रुग्णालयात जावं लागतं. विनोद कांबळी यांना २०१३ मध्ये ह्रदयविकाराचा धक्का बसला होता. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्यानं रुग्णालयात नेऊन विनोद कांबळी यांचा जीव वाचवला होता. सचिन तेंडुलकरनं १९८९ नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर विनोद कांबळीनं १९९१ मध्ये पदार्पण केलं. विनोद कांबळीनं पाकिस्तान विरुद्ध पहिली मॅच खेळली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community