-
ऋजुता लुकतुके
क्रिकेट आणि हॉकीतील भारत, पाकिस्तान युद्ध आपल्याला नवीन नाही आहे. दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी मैदानावर आमने सामने येतात तेव्हा खेळाचा वेगळाच रंग पाहायला मिळतो. त्यात चाहत्यांच्या कट्टरतेचा रंगही मिसळतो. ॲथलेटिक्समध्ये आता हे युद्ध सुरू झालं आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक प्रकारात भारताच्या गतविजेत्या नीरज चोप्राकडून सुवर्ण पदक हिसकावून घेतलं ते पाकिस्तानच्या नदीम अरशदने. दोन आशियाई खेळाडू आता जागतिक मैदानावर आमने सामने येताना दिसणार आहेत. (Neeraj Chopra vs Nadeem Arshad)
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : अंतिम पनघल भारतात परतली, निर्दोष असल्याचा केला दावा )
पण, इथं मैदानावर युद्ध असलं तरी मैदानाबाहेर नीरज चोप्राच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा नीरज चोप्रा तर पाकिस्तानचा अरशद नदीम यांच्यात मुख्य लढत होती. नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात ९२.९३ मीटरपर्यंत भालाफेक केली. त्याने फेकलेला हा भाला ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक लांब भालाफेक ठरला. नीरज चोप्राची दुसरी फेक ८९.४५ मीटरपर्यंत गेला. त्यामुळे या भालाफेक स्पर्धेत नदीमला सुवर्णपदक तर नीरज चोप्राला रौप्य पदक मिळालं. (Neeraj Chopra vs Nadeem Arshad)
(हेही वाचा- Raj Thackeray: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी पवार आणि ठाकरेंना घेरलं)
मुलाने रौप्य पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्रा यांच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. नीरजने रौप्य पदक मिळवलं. त्याला मिळालेलं रोप्य पदक आम्हाला सुवर्णपदकाप्रमाणे भासत आहे. तो घरी आल्यानंतर मी त्याच्या आवडीचं जेवण तयार करणार आहे.ज्या खेळाडूला सुवर्णपदक मिळालं आहे, तोदेखील माझा मुलगाच आहे, अशी प्रतिक्रिया नीरजच्या आई सरोज देवी यांनी दिली. (Neeraj Chopra vs Nadeem Arshad)
Neeraj Chopra’s mother said, “We are happy with the silver. The one who got the gold (Arshad Nadeem) is also my child.”
Thank you, mother, for the beautiful message. 🇮🇳🇵🇰👏 #OlympicGames pic.twitter.com/4t5q025rrH— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) August 8, 2024
नीरजच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केले. नीरज चोप्राने आपली चमक दाखवली आहे. नीरजच्या रुपात ऑलिम्पिकमधील आणखी एका यशामुळे भारताला आनंद झाला आहे. रौप्यपदक मिळवल्यामुळे नीरज चोप्रोचे खूप खूप अभिनंदन. नीरज आगामी पिढ्यातील अनेक खेळाडूंना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रेरित करीत राहील, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. (Neeraj Chopra vs Nadeem Arshad)
(हेही वाचा- IOC on Vinesh Phogat : ‘विनेश प्रकरणाला मानवी बाजू. पण….’ थॉमस बाख आणखी काय म्हणाले?)
दरम्यान, या आधीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं. त्याच्या या निर्भेळ यशानंतर तेव्हादेखील संपूर्ण भारतात जल्लोष करण्यात आला होता. (Neeraj Chopra vs Nadeem Arshad)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community