Anti Conversion Law : उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत १,६८२ जणांना अटक

२०२० साली धर्मांतरविरोधी कायदा (Anti Conversion Law) लागू करण्यात आला.

119
उत्तरप्रदेशात धर्मांध मुसलमानांकडून लव्ह जिहादच्या घटना दररोज घडवल्या जातात. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी योगी सरकारने राज्यात धर्मांतर विरोधी कायदा (Anti Conversion Law) आणला. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर राज्यात १ हजार ६८२ जणांना अटक करण्यात आली आहे.

८१८ प्रकरणांमध्‍ये आरोपपत्र दाखल

या कायद्याच्या अंतर्गत ३१ जुलैपर्यंत ८३५ जणांना अटक करण्यात आलेली आहे. २०२० साली धर्मांतरविरोधी कायदा (Anti Conversion Law) लागू करण्यात आला. त्या कायद्याच्या अंतर्गत आतापर्यंत २ हजार ७०८ लोकांना ओळखण्‍यात आले आहे. यातील पसार असणार्‍यांचा शोध घेतला जात आहे. एकूण ९८ टक्‍के म्‍हणजे ८१८ प्रकरणांमध्‍ये आरोपपत्र दाखल करण्‍यात आले आहे, तर १७ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. आमीष दाखवणे, धमकी देणे किंवा अन्‍य कोणत्‍याही मार्गाने धर्मांतराला (Anti Conversion Law) प्रवृत्त करणार्‍यांना सोडले जाणार नाही. १२४ लोकांची इतरांचे धर्मांतर करण्‍यात कोणतीही भूमिका नसल्‍याचे आढळून आल्‍याने त्‍यांना सोडून देण्‍यात आले आहे. अन्‍य ७० जणांनी न्‍यायालयात शरणागती पत्‍करली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.