अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेअर लागू होणार नाही, PM Narendra Modi यांचे आश्वासन

188
आयटीबीपी दल शौर्य आणि समर्पणाचे प्रतिक - PM Narendra Modi

अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेअर लागू होणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसद भवनात १०० मागासवर्गीय खासदारांना दिले. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी एससी-एसटीमध्ये क्रिमिलेअर लागू करण्याचाही विचार केला पाहिजे, असे म्हटले हाेते. त्यावर खासदारांनी पंतप्रधानांना निवेदन देऊन चिंता व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीवर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने (रामविलास) चिंता व्यक्त केली होती. याविरोधात न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचेही पक्षाच्या वतीने जाहीर केलेले आहे.

(हेही वाचा – अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ताची Uddhav Thackeray यांनी दिल्लीत घेतली भेट; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट)

न्यायालयाने एससी-एसटीच्या आरक्षणाबाबत क्रिमिलेअरचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. आता त्याची अंमलबजावणी होता कामा नये, अशी आमची भावना भाजपा खासदार फग्गनसिंह कुलस्ते यांनी मांडली. तसेच खासदारांचे जे मत आहे तीच भावना पंतप्रधानांचीही (PM Narendra Modi) आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला काळजी करू नका. एससी-एसटींसाठी क्रिमिलेअर लागू होणार नाही, असे स्पष्टच सांगितले आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर भाजपाचे खासदार सिकंदर कुमार यांनी आमच्या मागणीवर पंतप्रधान सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलेअरबाबत नोंदवलेल्या निरीक्षणामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. त्याबाबत असंख्य लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. मात्र त्यांना काय उत्तर द्यावे, हेच समजत नाही.

(हेही वाचा – IOC on Vinesh Phogat : ‘विनेश प्रकरणाला मानवी बाजू. पण….’ थॉमस बाख आणखी काय म्हणाले?)

यातून मार्ग काढण्यासाठी भाजपा खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. विषय समजावून घेतल्यानंतर त्यांनी आमच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा शब्द दिल्याचेही सिकंदर कुमार यांनी स्पष्ट केले. भाजपाचे ओडिशातील खासदार रवींद्र नारायण बेहरा यांनी सांगितले की, सर्वांनी एकमताने पंतप्रधानांकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याची मागणी केली. त्यावर, एससी-एसटी आरक्षणात क्रिमिलेअरचा समावेश केला जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. बेहरा यांच्या म्हणण्यानुसार, मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की सरकार या निर्णयाचा बारकाईने अभ्यास करत आहे. क्रिमिलेअर ओळखण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा कोणताही निर्णय नाही, पण एकच सूचना आहे. खासदारांनी म्हटले की, या निर्णयाची अंमलबजावणी करणे बंधनकारक नाही. भाजपा खासदार ब्रिजलाल म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांचे विचार काळजीपूर्वक ऐकून त्यांच्या भावनांसोबत उभे राहण्याचे आश्वासन दिले. खासदार डॉ. सिकंदर कुमार म्हणाले, आमच्या चिंतेवर पंतप्रधानांनी खासदारांच्या भावनांनुसार काम करू असे आश्वासन दिले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.