Israel वर हल्ला करण्यावर इराण सरकार आणि सैन्यातच मतभेद

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांना इस्रायलच्या नागरी वस्तीवर हल्ले नको आहेत.

118

इस्रायलने (Israel) हमासवर आणखी तीव्र हल्ले केल्यानंतर आता इराण इस्रायलच्या विरोधात पेटून उठला आहे. त्यासाठी इराणच्या राष्ट्रपतींनी इस्रायलवर हल्ला करण्याचा आदेश दिला. मात्र सरकारच्या आदेशानंतर यावर इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने या निर्णयाला विरोध केला आहे. इस्रायलवर नागरी वस्तीवर हल्ला करायचा की नाही, यावरून सैन्य आणि सरकारमध्ये आता मतभेद झाले आहेत. त्यामुळे तूर्तास इस्रायलवरील हल्ल्याचा विषय थंड पडला आहे.

(हेही वाचा Anti Conversion Law : उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत आतापर्यंत १,६८२ जणांना अटक)

मोसादच्या ठिकाण्यांना लक्ष्य करण्याची राष्ट्रपतीची अपेक्षा 

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांना इस्रायलच्या (Israel) नागरी वस्तीवर हल्ले नको आहेत. तर  इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सला नागरी वस्तींवर मिसाईल आणि रॉकेट हल्ले करायचे आहेत. इराणच्या याच राष्ट्रपतींच्या शपथविधीला आलेल्या हानियावर इस्रायलने मिसाईल डागले होते. पेजेशकियन हे उदारमतवादी आहेत. नागरी वस्त्यांवर हल्ले केल्यास युद्ध भडकू शकते असे त्यांचे मत आहे. तसेच युद्ध झाल्यास इराणला मोठे नुकसान होऊ शकते, असे त्यांना वाटत आहे. नागरिकांना टार्गेट करण्याऐवजी मोसादच्या ठिकाण्यांना लक्ष्य करण्याचे मत त्यांनी मांडले आहे. अजरबैजान, इराकी कुर्दीस्तानमध्ये हे ठिकाणे आहेत. यासाठी ते या दोन्ही देशांना याची माहितीही देण्याची मागणी करत आहेत. इराणचे सैन्य थेट सर्वोच्च नेता अयातुल्ला खामनेई यांना रिपोर्ट करते. यामुळे सरकारमध्ये त्यांची ताकद जास्त असते. इस्रायलवर (Israel) हल्ला करण्याचे आदेश खामनेई यांनीच दिले होते. रिवोल्यूशनरी गार्डला हिजबुल्लाहसोबत मिळून हल्ला करायचा आहे. तेल अवीववर थेट हल्ला करण्याची भुमिका एलीट फोर्स कुद्स फोर्सचे कमांडर इस्माइल कानी यांनी घेतली आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी लढाऊ विमाने तैनात केली आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.