Sun Temple : सूर्य मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे?

136
Sun Temple : सूर्य मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे?

सूर्य मंदिर हे हिंदू धर्मातल्या सूर्यदेव म्हणजेच सूर्याला समर्पित आहे. हे संपूर्ण मंदिर १०० फूट म्हणजेच ३० मी. उंचीच्या रथाच्या आकारात बांधलेलं आहे. या सुर्यमंदिराच्या रथाची चाकं आणि घोडे प्रचंड मोठे आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की, या संपूर्ण रथाचं बांधकाम दगडी स्वरूपातलं आहे. गतकाळामध्ये २०० फूट म्हणजेच ६१ मीटर पेक्षा जास्त उंचीवर असलेला या सूर्य मंदिराचा (Sun Temple) बराचसा भाग उध्वस्त झालेला आहे. खासकरून या शतकातला सर्वांत मोठा शिकारा टॉवर हा आता तिथे राहिलेला नाही. त्याकाळी मंदिराचा हा मंडप आता शिल्लक असलेल्या मंडपांपेक्षाही खूपच उंच होता.

आताचं टिकून राहिलेलं सूर्य मंदिर त्याच्या वरचं नक्षीकाम आणि विविध अप्रतिम कलाकृती, त्यावर कोरलेल्या प्रतिमा आणि वेगवेगळ्या थीम, कामुक आणि मैथुन दृश्ये यांसाठी प्रसिद्ध आहे. या सूर्य मंदिराला (Sun Temple) सूर्य देवालयही म्हणतात. हे सूर्य मंदिर म्हणजे ओडिसी वास्तुकला किंवा कलिंग वास्तुकलेचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. कोणार्कच्या सूर्य मंदिराच्या विनाशाचं कारण हा अजूनही एक वादाचा मुद्दा आहे. १५व्या आणि १७व्या शतकादरम्यान मुस्लिम आक्रमकांनी हे सूर्य मंदिर अनेकवेळा पडण्याचा प्रयत्न केला होता.

(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांत वाढ; ५ महिन्यांत ५०७ गुन्हे दाखल)

जागतिक वारसा स्थळ म्हणूनही सूर्य मंदिर प्रसिद्ध 

१६७६ सालच्या सुरुवातीच्या काळात या मंदिराला युरोपियन खलाशी नोंदींनुसार ब्लॅक पॅगोडा असं म्हटलं गेलंय. कारण त्या काळी ते मंदिर एका मोठ्या काळ्या रंगाचा टायर्ड टॉवरसारखं दिसत होतं. त्याचप्रमाणे पुरी इथल्या जगन्नाथ मंदिराला व्हाईट पॅगोडा असं म्हटलं जायचं.

ही दोन्ही मंदिरं बंगालच्या उपसागरातल्या खलाशांसाठी आजही महत्त्वाची संकेतचिन्ह म्हणून काम करतात. सध्या अस्तित्वात असलेलं सूर्य मंदिर ब्रिटिश भारतातल्या पुरातत्व पथकांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे अंशतः का होईना, पण पुनर्संचयित केलं गेलं आहे. १९८४ साली UNESCO ने या सूर्य मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं आहे. हे सूर्य मंदिर (Sun Temple) हिंदूंसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. इथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या आसपास चंद्रभागा मेळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक जमतात. कोणार्कच्या सूर्य मंदिराचं भारतीय सांस्कृतिक वारसा म्हणून महत्त्व दर्शवण्यासाठी १० रुपयांच्या भारतीय चलनी नोटेवर उलट बाजूला या मंदिराचं चित्रण केलेलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.