संगीत जगलेला माणूस : Pandit Vishnu Narayan Bhatkhande

177
संगीत जगलेला माणूस : Pandit Vishnu Narayan Bhatkhande

पंडित विष्णू नारायण भातखंडे (Pandit Vishnu Narayan Bhatkhande) यांचा जन्म १० ऑगस्ट १८६० साली मुंबईतल्या वाळकेश्वर येथे झाला. त्यांच्या घरात संगीताचा वारसा नव्हता तरीही त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की, विष्णू नारायण आणि त्यांच्या भावंडांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घ्यावं. त्यासाठी विष्णू नारायण यांचे वडील एका श्रीमंत व्यावसायिकाकडे काम करत होते.

वयाच्या पंधराव्या वर्षी विष्णू नारायण भातखंडे (Pandit Vishnu Narayan Bhatkhande) हे सतार वाजवायला शिकू लागले. त्यानंतर त्यांनी संगीताशी संबंधित असलेल्या संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात केली. १८८५ साली त्यांनी पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये बी.ए. चं पदवी शिक्षण पूर्ण केलं. मग पुढे त्यांनी १९८७ साली मुंबई युनिव्हर्सिटीच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून कायद्याचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढे काही काळ त्यांनी फौजदारी कायद्याविषयीचं काम केलं.

(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांत वाढ; ५ महिन्यांत ५०७ गुन्हे दाखल)

१८८४ साली विष्णू नारायण भातखंडे (Pandit Vishnu Narayan Bhatkhande) हे ‘गायन उत्तेजक मंडळी’ या संगीत प्रशंसक असलेल्या सोसायटीचे सदस्य झाले. त्यामुळे त्यांना संगीत सादरीकरण करण्यासाठी आणि संगीताची शिकवणी देण्यासाठी खूप मदत झाली. त्यांनी सहा वर्षे मांडली येथे रावजीबुवा बेलबागकर आणि उस्ताद अली हुसेन यांसारख्या संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली ख्याल आणि धृपद या दोन्ही प्रकारातल्या वेगवेगळ्या रचना शिकून घेतल्या.

१९०० सालापर्यंत विष्णू नारायण भातखंडे हे संगीताचा सराव आणि सादरीकरण छंद म्हणून किंवा रिकाम्या वेळेतच करायचे. पण ज्यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलगी या दोघी हे जग सोडून गेल्या, त्यावेळी त्यांनी कायद्याचा सराव सोडून आपलं संपूर्ण लक्ष संगीताकडेच केंद्रित केलं. विष्णू नारायण भातखंडे यांनी भारतभर प्रवास केला. संगीतातले वेगवेगळे उस्ताद आणि पंडितांच्या भेटी घेतल्या. संगीतावर संशोधन केलं. त्यांनी नाट्यशास्त्र आणि संगीत रत्नाकर यांसारख्या प्राचीन ग्रंथांचाही अभ्यास सुरू केला.

(हेही वाचा – अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ताची Uddhav Thackeray यांनी दिल्लीत घेतली भेट; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट)

विष्णू नारायण (Pandit Vishnu Narayan Bhatkhande) यांनी भारतातल्या आपल्या प्रवासादरम्यान बडोदा, ग्वाल्हेर आणि रामपूर इथल्या तत्कालीन संगीत संस्थानांमध्ये आपला वेळ घालवला. रामपूर येथे ते तानसेन यांचे वंशज असलेले दिग्गज वीणा वादक उस्ताद वजीर खान यांचे शिष्य होते. तसंच विष्णू नारायण भातखंडे यांनी दक्षिण भारतातही प्रवास केला. १९०४ साली ते तत्कालीन मद्रास आणि सध्याच्या चेन्नई येथे गेले. तिथे स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी कर्नाटक संगीताशी ओळख करून घेतली.

त्यांनी मद्रास इथले थिरुवोटीयुर त्यागियर आणि टाचूर सिंगाराचार्य, रामनाथपुरम इथले पूची श्रीनिवास अय्यंगर आणि एट्टायपुरम इथले सुब्बारामा दीक्षितर यांसारख्या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गजांशी संपर्क वाढवला. पण भाषेच्या अडथळ्यामुळे हा संपर्क विष्णू नारायण यांच्या अपेक्षेपेक्षाही कमी फलदायी ठरला. विष्णू नारायण भातखंडे (Pandit Vishnu Narayan Bhatkhande) यांच्या त्या काळातल्या नियतकालिकात छापून आलेल्या संगीताच्या नोट्स नंतर मेरी दक्षिण भारत की संगीत यात्रा या शीर्षकाखाली प्रकाशित झाल्या होत्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.