Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय शेतकऱ्यांवर असा होतोय परिणाम?

Bangladesh Violence : भारतातून बांगलादेशला होणारी निर्यात त्यामुळे थांबली आहे.

126
Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय शेतकऱ्यांवर असा होतोय परिणाम?
  • ऋजुता लुकतुके

बांगलादेशमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचं (Bangladesh Violence) लोण देशभर पेटलं. हळू हळू जन आंदोलनाचं रुप त्याने धारण केलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून भारताने सध्या बांगलादेशबरोबरच्या आपल्या सीमा बंद केल्या आहेत. कारण, तिथून बेकायदेशीर रित्या निर्वासितांचा लोंढा भारतात येण्याची शक्यता आहे. पण त्याचा फटका देशातील शेतकऱ्यांनाही बसतो आहे. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करत असल्यानं या घडामोडींनी दोन्ही देशांचे नुकसान होणार आहे. नाशिकमधून दररोज कांद्याचे ७० ते ८० ट्रक बांगलादेशला रवाना होतात. नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

एका ट्रकमध्ये ३० टन कांदा भरला जातो. मात्र, कांद्याची वाहतूक थांबली असल्याचे कांदा निर्यातदारांनी सांगितले. मागील आठवड्यात बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची नामुष्की ओढवू शकते. ५० हजार टन कांद्याचा टप्पा पार करण्यापर्यंत भारतातील कांदा निर्यातदार व शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. यातील ८५ टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून जाणार होता. मात्र, सध्या सीमा केल्या असल्याने कांद्याचे ट्रक जागच्या जागी थांबले आहेत. कांद्याची सर्वाधिक निर्यात थांबल्यानं रोजचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार थांबले आहेत. (Bangladesh Violence)

(हेही वाचा – Drugs : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून ५ हजार ५०० किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट)

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची राजू शेट्टींची मागणी 

दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra) यांना पत्र लिहलं आहे. बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळं भारताची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. दळणवळण होत नसल्यानं कांद्याची वाहतूक होत नसल्याचं राजू शेट्टींनी पत्रात म्हटलं आहे. बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

भारताच्या शेजारील देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार (Bangladesh Violence)  सुरु आहे. या राजकीय संघर्षामुळं पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. गेल्या दोन तीन दिवसात हिंसाचारात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हिंसाचारग्रस्त बांगलादेशशी भारताचे मोठे व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देश अनेक जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात करतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.